नागपूर दिनांक 1 एप्रिल (प्रतिनिधी )
नागपूरच्या प्रविणा दाढे हिने मिसेस यूनिवर्स 2022 हा किताब पटकावला आहे. यापूर्वी मिसेस नागपूर, मिसेस सुपर मॉडल हे किताब जिं कल्यानंतर मिसेस यूनिवर्स 2022 हया सौदर्य स्पर्धेमध्ये जिंकुन नागपूर मध्ये राहणाऱ्या मिसेस प्रविणा दाढे हिने परत एकदा स्वतःला सौंदर्याच्या कसोटित खरे सिद्ध केले आहे.
आग्रा येथिल “रॉयल रिजेंट या 5 स्टार हॉटेलमध्ये आयोजित करण्यात आलेल्या मिसेस यूनिवर्स या स्पर्धेमध्ये त्याच्या डोक्यावर मिसेस यूनिवर्स चा मुकुट सजला.
त्यांनी सांगितले की धकाधकी आणि धावपळीच्या जिवनात मुलांच्या संगोपनासहित संपूर्ण कुटुंबाची जबाबदारी पार करत असताना स्वतः साठी पण काहितरी करण्याची त्यांची आवड होती
स्वतः एक हाऊसवाईफ असूनसुध्दा मॉडलिंग क्षेत्रात स्वतःचे स्थान निर्माण करावे हे त्यांंचे स्वप्न होते,हे स्वप्न पूर्ण करण्यासाठी त्या स्वतः ला फीट ठेवण्याचा नेहमी प्रयत्न करतात.
आणि त्यांना परिवारातील सर्व सदस्यांचा भरपूर सहयोग मिळतो आणि त्यामुळेच त्या ह्या स्पर्धेचा तयारीला भरपूर वेळ सरावाकरीता देवू शकल्या असे त्यांनी सांगितले
या स्पर्धेत अनेक शहरामधील 37 प्रतिस्पर्धी सहभागी झाले होते. यामध्ये स्वतःला सिद्ध करने सोपे न्हवते परंतु मेहनत आणि प्रचंड इच्छाशक्तीच्या जोरावर परत एकदा ही स्पर्धा जिंकणे त्यांना सोपे गेले.
आयोजक खूशी फिल्म आणि खूशी चॅरीटेबल फाउंडेशन चे अध्यक्ष रोनक सोलंकी आाणि सचिव पूजा रावत होत्या. जज म्हणून बॉलीवूड अभिनेती नैना नंदा होत्या. तसेच शो च्या कोरीओग्राफर अंशिका सक्सेना होत्या आणि प्रमुख पाहुण्या म्हणून सुनिता सिंह,अजय शर्मा,काजल कुशवाह, रजनी जाहर उपस्थीत होते.
या प्रेस कॉन्फरेसमध्ये श्रीमंत डॉ. राजे मुधोजी महाराज भोसले, मिसेस युनिवर्स प्रविणा दाढे, माजी उपमहापौर मनीषा धावडे, संयोजक निखिल भुते, विष्णुपंत दारव्हेकर, अॅड. वैशाली बगाडे, हिना आंबेकर प्रा. विक्रांत चिलाटे हे प्रामुख्याने उपस्थित होते.






