पॅरासिटामॉलचे अतिसेवन आणि 27 वर्षीय युवकाचा…….

0
14

वर्धा दिनांक 16 मार्च (प्रतिनिधी)

औषधाचे दुष्परिणाम असतात असे डॉक्टर ही नेहमी कबूल करत असतात पण औषधाच्या अतिसेवनाने किती गंभीर परिणाम होऊ शकतो याचं उदाहरण समोर आले आहे

पॅरासिटामॉल (Paracetamol) गोळ्यांचाओव्हरडोज घेतल्याने 27 वर्षीय युवकाचा मृत्यू (Death) झाला आहे. या युवकावर तब्बल 40 दिवस उपचार करण्यात आले. मात्र डॉक्टरांना त्याला वाचविण्यात यश आले नाही. याप्रकरणी वर्धा शहर पोलिसांत अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.

रजत मेंढे (27) असे मयत तरुणाचे नाव असून तो शिवाजी चौक येथील रहिवासी आहे. वर्ध्याच्या एका खासगी फायनान्स कंपनीमध्ये तो सुरक्षा रक्षक म्हणून कार्यरत होता. अनेकदा छोट्या मोठ्या आजारासाठी नागरिक डॉक्टरांच्या सल्याविना औषधोपचार घेत असतात. अनेकांना याचा लाभ होतो. मात्र काहींच्या शरीरावर औषधाचे दुष्परिणाम सुद्धा होतात. यामुळे डॉक्टरांच्या सल्याविना औषधी घेणे नागरिकांनी टाळावे. (Youth dies during treatment in wardha due to overdose of paracetamol tablets)

रजत मेंढे हा 29 जानेवारी रोजी रात्री कर्तव्यावर आला. सकाळी तो तेथेच झोपून होता. 30 जानेवारी रोजी सकाळी त्याने वडिलांना फोनवर संपर्क साधत प्रकृती बिघडली असल्याची माहिती दिली. वडिलांनी वर्ध्यात येत त्याला सेवाग्राम रुग्णालयात उपचारासाठी नेले. सेवाग्राम रुग्णालयात रजतवर उपचार सुरू करण्यात आले.

डॉक्टरांनी विचारपूस केली असता, त्याने पॅरासिटामॉलच्या गोळ्या खाल्ल्याचे सांगितले. सेवाग्राम रुग्णालयात त्याच्यावर उपचार करण्यात आले. मात्र रजतचा मृत्यू झाला. याप्रकरणी सुरूवातीला सेवाग्राम पोलिसांत नोंद करण्यात आली. त्यानंतर प्रकरण आज वर्धा पोलिसांकडे आज वर्ग करण्यात आले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here