यवतमाळ दि. 14 मार्च (प्रतिनिधी) :
नगरपालिका प्रशासन विभागाद्वारे अनुकंपा तत्वावर नियुक्ती देण्याबाबतची गट-क ची पात्र व अपात्र उमेदवारांची स्वतंत्र प्रतीक्षासूची तयार करण्यात आली असून ही यादी जिल्हाधिकारी कार्यालय, यवतमाळ यांचे संकेतस्थळ, सूचनाफलक आणि यवतमाळ जिल्ह्यातील सर्व नगर परिषद व नगर पंचायत यांच्या सूचना फलकावर प्रसिद्ध करण्यात आली आहे.
सदर प्रकरणी ज्यांना आक्षेप/ सूचना/हरकती असतील त्यांनी त्या २५ मार्च २०२२ पर्यत नगर पालिका प्रशासन विभाग, जिल्हाधिकारी कार्यालय,यवतमाळ येथे कार्यालयीन वेळेत स्वत: हजर राहून पुराव्यासहीत सादर कराव्यात.
तसेच या मुदतीनंतर कार्यालयीन ईमेल व पोष्टाद्वारे प्राप्त झालेल्या सूचना/हरकती/तक्रारी विचारार्थ घेतल्या जाणार नाहीत, याची सर्वांनी नोंद घ्यावी, असे जिल्हाधिकारी अमोल येडगे यांनी कळविले आहे.






