एकाच दिवशी विविध घटनेत तरुणी, अल्पवयीन युवक आणि युवकाची हत्या

0
36

गोंदिया दिनांक 24 फरवरी (प्रतिनिधी)

विविध कारणातून गोंदियात तिहेरी हत्या (Tripple Murder) झाल्याची घटना बुधवारी घडल्या आहेत. मृतांमध्ये एका तरुणाचा, एका अल्पवयीन मुलाचा आणि एका तरुणीचा समावेश आहे. तर एक तरुण जखमी (Injured) झाला आहे.

एकाच दिवशी झालेल्या या हत्याकांडामुळे पोलिसांच्या कार्यप्रणालीवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. गंभीर जखमी तरुणावर नागपुरात उपचार सुरु आहेत. आशिष ठाकूर असे जखमी तरुणाचे नाव आहे. (Triple murder in Gondia on the same day, one seriously injured)

पहिल्या घटनेत खंडणीसाठी एका 17 वर्षीय मुलाची हत्या केल्याची घटना घडली आहे. याप्रकरणी पोलिस पुढील कारवाई करीत आहेत.

दुसऱ्या घटनेत एकर्फी प्रेमातून एका तरुणाने एका तरुणीची निर्घृण हत्या केल्याची घटना घडली आहे. तरुणीच्या डोक्यावर लोखंडी हातोड्याने वार करुन तिची हत्या करण्यात आली.

तर तिसऱ्या घटनेत रामनगर पोलिस ठाण्याच्या हद्दीतील बसंत नगर परिसरात रात्री उशिरा गोंदिया शहरात अज्ञात आरोपीने दोघांची हत्या करण्याचा प्रयत्न केला. यामध्ये एकाचा मृत्यू झाला तर दुसरा गंभीर असून त्याच्यावर रुग्णालयात उपचार सुरु आहेत. राजा सांडेकर असे मयत तरुणाचे नाव आहे. हल्ल्याचे कारण अद्याप कळू शकले नाही. याप्रकरणी रामनगर पोलिस पुढील तपास करीत आहेत.

 

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here