गेल्या 24 तासात 4 पॉझिटिव्ह ; 167 कोरोनामुक्त 

0
9

यवतमाळ दि. 14 फेब्रुवारी (प्रतिनिधी)

जीएमसी, डीसीएचसी व खाजगी रुग्णालयात 1730 बेड उपलब्ध

* ॲक्टीव्ह पॉझिटीव्ह 367

 

गेल्या 24 तासात जिल्ह्यात 4 नवीन कोरोना पॉझिटिव्ह रूग्ण आढळून आले तर 167 जण कोरोनामुक्त झाले आहेत. सध्या ॲक्टीव्ह पॉझिटीव्ह रुग्णांची संख्या जिल्ह्यात 361 व बाहेर जिल्ह्यात 6 अशी एकूण 367 झाली आहे. त्यातील 25 रूग्ण रूग्णालयात तर 342 गृहविलगीकरणात आहेत.

जिल्हा परिषद आरोग्य विभागातर्फे प्राप्त अहवालानुसार आज एकूण 444 जणांचे रिपोर्ट प्राप्त झाले. यापैकी 4 अहवाल पॉझिटिव्ह असल्याने उर्वरित 440 जणांचे रिपोर्ट निगेटिव्ह आले आहेत. जिल्ह्यात आतापर्यंत एकूण पॉझेटिव्ह रुग्णांची संख्या 78917 आहे तर बरे झालेल्यांची एकूण संख्या 76748 आहे. जिल्ह्यात कोरोनामुळे एकूण 1802 मृत्यूची नोंद आहे.

आज पॉझिटिव्ह आलेल्या 4 रूग्णांमध्ये 4 महिला असून त्यात यवतमाळ तालुक्यातील तीन व इतर शहरातील एका रूग्णाचा समावेश आहे. जिल्ह्यात आतापर्यंत आठ लाख 31 हजार 790 चाचण्या झाल्या असून त्यापैकी सात लाख 52 हजार 831 निगेटिव्ह आहेत. सद्यस्थितीत जिल्ह्याचा पॉझिटीव्हीटी दर 9.49 असून दैनंदिन पॉझिटीव्हीटी दर 0.90 आहे तर मृत्यूदर 2.28 आहे.

जीएमसी, डीसीएचसी व खाजगी रुग्णालयात 1730 बेड उपलब्ध : जिल्ह्यातील शासकीय वैद्यकीय महाविद्यालय, 11 डेडीकेटेड कोव्हीड हेल्थ सेंटर आणि 7 खाजगी कोव्हीड हॉस्पीटलमध्ये एकूण बेडची संख्या 1766 आहे. यापैकी 36 बेड रुग्णांसाठी उपयोगात असून 1730 बेड उपलब्ध आहेत. यात शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात एकूण 787 बेडपैकी 36 बेड रुग्णांसाठी उपयोगात असून 751 बेड शिल्लक, 11 डीसीएचसीमध्ये एकूण 857 बेडपैकी पुर्ण 857 बेड शिल्लक आणि 7 खाजगी कोव्हीड रुग्णालयात एकूण 122 बेडपैकी पुर्ण 122 बेड शिल्लक आहेत.

कोरोना रुग्णसंख्येत सगळीकडे वाढ होत असून नागरिकांनी मास्कचा वापर, वारंवार हात धुणे व सुरक्षीत अंतर राखणे या कोरोना त्रीसुत्री नियमांचे पालन करावे, तसेच कोरोनाचे लसीकरण पुर्ण करून स्वत:ची काळजी घ्यावी, असे आवाहन जिल्हाधिकारी अमोल येडगे यांनी केले आहे.

 

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here