शासकीय व अनुदानित वसतिगृह, निवासी शाळा सुरु

0
8

नागपूर, दि.09 फेब्रुवारी (प्रतिनिधी)

कोरोनाचा प्रादुर्भाव होऊ नये तसेच कोरोना बाधितांच्या संख्येत वाढ होऊ नये यासाठी शासनाने दिलेल्या निर्देशानुसार नागपूर विभागातील सर्व शासकीय व अनुदानित वस्तीगृहे तसेच शासकीय निवास शाळा बंद करण्यात आल्या होत्या.

सद्यस्थितीत कोविडची परिस्थिती आटोक्यात येत असल्यामुळे सामाजिक न्याय विभागाच्या वस्तीगृहामध्ये व शासकीय निवासी शाळांमध्ये राहणाऱ्या विद्यार्थ्यांची अडचण लक्षात घेवून कोविड-19 च्या नियमावलीला अनुसरुन व आवश्यक काळजी घेऊन शासनाने दिलेल्या निर्देशानुसार वस्तीगृहे सुरु करण्यात आलेली आहेत. समाज कल्याण विभागाच्या शासकीय वस्तीगृहामध्ये प्रवेशप्रक्रिया सुरु झाली असून ज्या विद्यार्थ्यांनी प्रवेश घेतलेला आहे त्यांच्याकरीता शासकीय वसतिगृहे सुरु करण्यात आलेली आहेत.

नागपूर विभागीय स्तरावरील नागपूर, वर्धा, भंडारा, गोंदिया, चंद्रपूर आणि गडचिरोली येथील शासकीय वस्तीगृहात प्रवेश प्रक्रिया सुरु झाली आहे. ज्या विद्यार्थ्यांनी शासकीय वस्तीगृहात प्रवेश घेतलेला आहे त्यांच्या पालकांनी विद्यार्थ्यांना वस्तीगृहात पाठवावे. कोविड-19 च्या नियमाचे पालन करीत सामाजिक न्याय विभागांतर्गत असलेली विभागातील सर्व शासकीय वसतिगृहे सुरु करण्यात आलेली आहेत.

सन 2020-21या शैक्षणिक सत्रासाठी प्रवेश प्रक्रिया देखील सुरु करण्यात आलेली आहे. तेव्हा ज्या मुला-मुलींना शासकीय वस्तीगृहात प्रवेश घ्यावयाचा आहे त्यांनी अर्ज भरावे. अधिक माहितीसाठी विद्यार्थ्यांनी संबंधित जिल्ह्याचे सहाय्यक आयुक्त, समाज कल्याण कार्यालय तसेच संबंधित शासकीय वसतिगृह येथे संपर्क साधावा, असे आवाहन समाज कल्याण विभागाचे प्रादेशिक उपायुक्त डॉ. सिद्धार्थ गायकवाड यांनी केले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here