भीषण अपघात, ट्रॅक्टरचे दोन तुकडे ,एक जागीच ठार तर एक गंभीर

0
18

चंद्रपूर /गड़चिरोली दिनांक 27 जानेवारी (प्रतिनिधी)

चंद्रपूर जिल्ह्यातील (Chandrapur district) ब्रह्मपुरी तालुक्यामध्ये एक भीषण अपघात (Accident) झाला आहे. रणमोचन गावाजवळ ट्रॅक्टर आणि क्रेटा कार (Tractor and Creta car)यांची रस्त्यावरती अपघाती धडक झाली.

ही धडक एवढी भयंकर होती की कारमधील एकाचा जागीच मृत्यू झाला आहे. तर दुसरा गंभीर जखमी अवस्थेत आहे.

गडचिरोली जिल्ह्यातील (Gadchiroli District) चामोर्शी येथील राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते माजी जि. प. उपाध्यक्ष अतुल गण्यारपवार (Atul Ganyarpawar) अपघातात गंभीर जखमी झाले आहेत, तर त्यांचे चुलत भाऊ आनंद यांचा घटनास्थळी मृत्यू, अतुल गण्यारपवार यांना ब्रह्मपुरीच्या खाजगी हॉस्पिटलमध्ये दाखल केले असून, हा अपघात एवढा भीषण होती की ट्रॅक्टरचे चक्क दोन तुकडे झाले आहेत.

दरम्यान पोलीस आणि स्थानिक नागरिकांनी घटनास्थळी धाव घेत अपघातग्रस्त नागरिकांना दवाखान्यात दाखल केलं आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here