पती पत्नीचे भांडण विकोपाला, तीन वर्षीय बालक अनाथ

0
13

रोज होणारे भांडण  इतकं विकोपाला गेला की पती- पत्नीने स्वतः वर रॉकेल ओतून पेटवून घेतले. यात दोघांचाही दुर्दैवी मृत्यू झाला आहे. या घटनेमुळं तीन वर्षांचा मुलगा अनाथ झाला आहे. परिसरात या घटनेमुळं हळहळ व्यक्त होत आहे.

भंडारा शहराला लागून असलेल्या कारधा गावात ही घटना घडली असून यात महेंद्र सिंगाडे वय ३८ वर्ष, मेघा सिंगाडे वय २९ वर्ष यांचा मृत्यू झाला आहे. भंडारा शहराला लागून असलेल्या कारधा निवासी महेंद्र सिंगाडे हा ग्राम टाकेपार येथील ग्रामपंचायतमध्ये कॉम्प्युटर ऑपरेट या पदावर कंत्राटी कर्मचारी होता.

मिळालेल्या माहितीनुसार, महेंद्र सिंगाडे यांच्यावर किरकोळ कर्ज असल्याने तो चिंतेच्या भरात दारूच्या आहारी जाऊ लागला होता. यामुळे घरी पती- पत्नी यांच्यात वाद वाढत गेले. शनिवारी रात्री ९.३० च्या दरम्यान पती-पत्नी यांचे भांडण झाले. हे भांडण इतके विकोपाले गेले की पती महेंद्र सिंगाडे यांनी स्वतःवर व पत्नीवर रॉकेल ओतून पेटवून घेतलं.

महेंद्र सिंगाडे आणि त्याची पत्नी हे दोघंही जळाली असल्याने दोघांचा जागीच मृत्यू झाला आहे. याच घरी त्याचा लहान भाऊ अणि आई -वडील सुद्धा राहतात. महेंद्र आणि त्याच्या पत्नीचा आवाज आल्याने त्यांनी घटनास्थळी धाव घेतली असता दोघे जळीत अवस्थेत दारात मृत पडून होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here