ट्रॅव्हल्स व ट्रकचा भीषण अपघात, 2 जागीच ठार तर 15 जखमी

0
18

चंद्रपूर  : दिनांक 14 जानेवारी (प्रतिनिधी)

नागपूर चंद्रपूर महामार्गावर ट्रॅव्हल्स आणि ट्रकचा भीषण अपघात होऊन दोन जण जागीच ठार झाले असून पंधरापेक्षा जास्त प्रवासी जखमी झाले आहे

खाजगी ट्रॅव्हल बस ही वरोरा येथील असल्याची माहिती समोर येत असून बस आणि ट्रकची समोरासमोर धडक झाल्याने हा भीषण अपघात घडला

आज वरोरा येथे झालेल्या भीषण अपघाताबाबत जिल्ह्याचे पालकमंत्री व राज्याचे आपत्ती व्यवस्थापन, मदत व पुनर्वसन, इतर बहुजन कल्याण विकास मंत्री विजय वडेट्टीवार यांना नागपुर येथील बैठकीत माहिती मिळताच त्यांनी तातडीने बैठक आटोपती घेतली. लगेच जिल्हाधिकारी, पोलिस अधीक्षक, जिल्हा शल्य चिकित्सक यांना फोन करून, अपघातग्रस्तांना तातडीने वैद्यकीय उपचार देण्याचे निर्देश दिले.

अपघातग्रस्तांसाठी त्वरीत रुग्णवाहिका पाठवून वरोरा ग्रामीण रुग्णालय, चंद्रपूर येथील शासकीय रुग्णालय येथे क्षणाचाही विलंब न करता उपचार करावे. अपघातानंतरचा एक तास अतिशय महत्वाचा असतो. जास्तीत जास्त रुग्णांना वाचविण्यासाठी डॉक्टरांनी प्रयत्नांची पराकाष्ठा करावी, असेही त्यांनी म्हटले. सर्व परिस्थितीवर पालकमंत्री लक्ष ठेवून आहेत.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here