मारबत घेऊन गेलेल्या 4 युवकांचा बुडून मृत्यू

0
9

गोंदिया जिल्याच्या आमगाव तालुक्या अतंर्गत येणाऱ्या काळीमाटु गावातील युवक मारबत घेऊन मानेकसा गावाजवळ असलेल्या बाघनदी जवळ गेले ,तेथे आंघोळी साठी काही युवक नदीत उतरले

सात युवक आंघोळ करीत असताना नदीच्या पाण्याचा अंदाज न आल्याने खोल पात्रात जाऊन त्यापैकी चार युवकांचा मृत्यू झाला असल्याची प्राथमिक माहिती समोर येत आहे, चारही युवकांचा देहाचा शोध घेण्याचे कार्य आपत्ती व्यवस्थापन करीत आहे.

मृतांमध्ये सुमित शेंडे 16 वर्ष ,रोहित बहेकार 16 वर्ष ,संतोष बहेकार 16 वर्ष , प्रणय खोब्रागडे 19 वर्ष यांचा समावेश आहे. चारही युवक 11 व्या वर्गात  शिक्षण घेत होते

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here