वाशिमचा 19 वर्षीय यश आफ्रिकेतील किलीमांजारोवर तिरंगा फडकवणार!

0
10

वाशिम : भारताच्या स्वातंत्र्यदिनी आफ्रिकेतील किलीमांजारो शिखर सर करुन वाशिमचा युवा तिरंगा फडकवणार आहे. वाशिम येथील 19 वर्षीय यश मारुती इंगोले या युवा गिर्यारोहकाची निवड आफ्रिका खंडातील ‘किलीमांजारो’ (उंची : सुमारे 5892 मीटर) शिखरावर चढाई करण्यासाठी निवड झाली आहे

शिखरावर चढाई करताना तेथील तापमान उणे 29 डिग्री सेल्सिअस असेल. तेथे जाण्यासाठी चार लाख रुपये खर्च लागणार आहे. यशची परिस्थिती तशी जेमतेम असल्याने त्याने वाशिम जिल्हाधिकारी षण्मुगराजन एस. यांच्याकडे मदतीची मागणी केल्यानंतर जिल्हाधिकारी यांनी पुढाकार घेऊन शासकीय अधिकाऱ्यांच्या मदतीने 1लाख 70 हजार निधी यशला दिला. बाकीचे पैशांची जमाजमव त्याचा संपूर्ण परिवार करीत असल्याचं यशने सांगितलं.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here