प्रचंड पावसात मुख्यमंत्री उद्धव ठाकरे रश्मी ठाकरे सोबत स्वतः गाडी चालवत पंढरपूरकडे रवाना

0
8

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (CM Uddhav Thackeray) प्रचंड पावसात स्वतः गाडी चालवीत आषाढी एकादशी निमित्त (Ashadhi Ekadashi 2021) विठ्ठल रुक्मिणीच्या शासकीय पूजेसाठी पंढरपूरला (Pandharpur) रवाना झाले आहेत. त्यांच्या बाजूला गाडीत त्यांची पत्नी रश्मी ठाकरे बसल्या आहेत.मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आपल्या कुटुंबासह मुंबईतील मातोश्री निवासस्थानावरुन दुपारी अडीचच्या सुमारास पंढरपूरकडे रवाना झाले.

मंगळवारी पहाटे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे कुटुंबासह विठ्ठल रुक्मिणीची पूजा करणार आहेत. आज मुंबई आणि पुणे परिसरात अतीमुसळधार पावसाची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे. त्यामुळे मुख्यमंत्री कार्यालयाने मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि त्यांचे कुटुंब यांच्या मुंबई ते पंढरपूर प्रवासासाठी रस्ते वाहतूक पावसाच्या परीस्थितीचा अंदाज घेऊनच मुख्यमंत्री आणि त्यांच्या कुटुंबाचा प्रवास निश्चित केला आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here