आषाढी एकादशीच्या शासकीय महापूजेचा मान वर्धेच्या दाम्पत्याला

0
10

प्रतिवर्षी आषाढी एकादशीला राज्याचे मुख्यमंत्री सपत्नीक श्री विठ्ठलाची महापूजा करतात. त्यांच्यासोबत राज्यातील एका दाम्पत्यालाही पूजेचा मान दिला जातो. यंदाच्या आषाढी एकादशीला पंढरपुरात होणाऱ्या महापुजेसाठी मुख्यमंत्र्यांसोबत पुजेचा मान असणाऱ्या मानाच्या वारकऱ्याची निवड करण्यात आली आहे

#आषाढी_एकादशीला पंढपुरातील विठू माऊलीच्या दर्शनासाठी वारक-यांची मोठी गर्दी असते. त्यामुळे मंदिरातील दर्शन रांगेतून एकाची निवड करुन मुख्यमंत्र्यांसोबत शासकीय महापूजेत सहभागी होण्याचा मान दिला जातो.

केशव शिवदास कोलते(71वर्ष) व इंदूबाई केशव कोलते(66वर्ष)  रा. संत तुकाराम मठ, वर्धा असे महापूजेचा मान मिळालेल्या भाग्यवंत दांम्पत्याचे नाव आहे. हे दोघेही #आषाढी_एकादशी ला #मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या हस्ते होणा-या महापूजेत सहभागी होणार आहे.

#Wardha

#Maharashtra

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here