यवतमाळात हाई प्रोफाइल जुगार,तब्बल 81 लाखांचा माल जब्त

0
9

यवतमाळ  जिल्ह्यातील भारी गावालगत असलेल्या स्वरा फार्म हाउसमध्ये एका हाय प्रोफाईल जुगार अड्ड्यावर पोलिसांनी छापा टाकून तब्बल 81 लाखांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला असून 19 जुगारींच्या मुसक्या आवळण्यात आल्या आहेत.

अटक करण्यात आलेले आरोपी हे यवतमाळ आणि चंद्रपूर जिल्ह्यातील प्रतिष्ठित असल्याने एकच खळबळ उडाली आहे.

पोलिसांना माहिती मिळाली की स्वरा फार्म हाऊस मध्ये हाई प्रोफाइल जुगार सुरू आहे,माहिती मिळताच पोलिसांनी छापा टाकला आणि पोलिसांच्या या कारवाईत तब्बल 19 जण रंगेहाथ पकडले गेले. पोलिसांनी या सर्व आरोपींना अटक केले असून सर्व मुद्देमाल जप्त केला आहे. या मुद्देमालाची एकूण किंमत 81 लाख 23 हजार रुपये आहे. यामध्ये जुगाऱ्यांकडून 19 लाख 23 हजार रुपये रोख, एक लाख 30 हजार रुपये किमतीचे सात मोबाईल तर 60 लाख 70 हजार रुपये किमतीची पाच चारचाकी वाहने, दोन दुचाकी जप्त केल्या आहेत. जप्त केलेल्या या सर्व मुद्देमालाची किंमत तब्बल 81 लाख 23 हजार रुपये एवढी आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here