वर्धा दिनांक 10 जून (प्रतिनिधी) :
ग्रामीण व नागरी भागात नागरिकांपर्यंत शासकीय, निमशासकीय व खाजगी सेवा पोहचविण्यासाठी तसेच सेवेकरीता नागरिकांचा वेळ व श्रम वाचविण्यासाठी जिल्हयात नव्याने 664 आपले सरकार सेवा केंद्र सुरु करण्यात येणार आहे.
ज्या व्यक्तींना आपले सरकार सेवा केंद्र सुरु करावयाचे आहे. अशा इच्छुक व्यक्तींनी दि.13 ते 21 जुनपर्यंत ऑनलाईन अर्ज सादर करावे, असे आवाहन करण्यात आले आहे.
केंद्र शासनाच्या राष्ट्रीय ई-गव्हर्नन्स कृती कार्यक्रमांतर्गत राज्यातील ग्रामीण व नागरी भागात नागरिकांपर्यंत शासकीय, निमशासकीय व खाजगी सेवा पोहचविण्यासाठी तसेच सेवेकरीता नागरीकांचा वेळ व श्रम वाचविण्याचे दृष्टीने राज्यात आपले सरकार सेवा केंद्र मंजूर करण्यात आले आहे. यामध्ये वर्धा जिल्हयात 664 आपले सरकार सेवा केंद्र मंजूर करण्यात आले आहे.
यासाठी Wardha.Gov.in या संकेतस्थळावर प्रसिध्द करण्यात आलेल्या https://forms.gle/7qMjwXLMY3sPU7TWA लिंकवर ऑनलाईन अर्ज सादर करावा, असे जिल्हाधिकारी कार्यालयाच्यावतीने कळविण्यात आले आहे






