शेगाव/ अकोला दिनांक 6 जून ( प्रतिनिधी)
कोरोनामूळे गेल्या २ वर्षापासून बंद असलेली ‘श्रीं’च्या पालखीच्या दर्शन अकोलेकरांना मिळणार आहे. या माऊलीच्या पालखीच्या स्वागतासाठी अकोल्यात ठिकठिकाणी जय्यत तयारी करण्यात येणार आहे.
शहरातील सुरू असलेले रस्त्याचे बांधकाम यामुळे यंदा पालखीच्या मार्गात बदल झाले आहेत. रविवारी दुपारी प्रशासनाकडून हा मार्ग जाहीर करण्यात आला. दरम्यानच्या काळात या मार्गावरील वाहतून अन्यकडे वळविण्यात आली आहे.
६ जूनला शेगावमधून पालखी प्रस्थान…
आज ६ जून रोजी सकाळी ७ वाजता शेगाव येथील श्री संत गजानन महारांजाच्या मंदिरातून पालखीचे प्रस्थान होणार आहे. त्यानंतर दुपारी ‘श्री क्षेत्र नागझरी’ येथे आगमन व पारस येथे मुक्काम करणार आहे.तर दुसऱ्या दिवशी ७ जून रोजी अकोल्यातील गायगांव येथे आगमन व भौरद येथे मुक्काम करणार आहे.
८ जून रोजी अकोला येथे आगमन व मुंगीलाल बजोरिया विद्यालयाच्या प्रांगणात मुक्काम तर ९ जून रोजी जुने शहरातील जिल्हा परिषद शाळेच्या आवारात मुक्काम होणार आहे. त्यानंतर १० जून रोजी भरतपूर येथे आगमन व वाडेगाव येथे मुक्काम, त्यानंतर विविध शहरांमध्ये मुक्काम करून पालखी ८ जुलै रोजी श्रीक्षेत्र पंढरपूर येथे पोहचणार आहे.






