यवतमाळ मध्ये गैंगवार, एकाचा मृत्यू,दोन गंभीर जखमी

0
10

यवतमाळ दिनांक 9 मई ( प्रतिनिधी)

यवतमाळ (yavatmal) येथील पाटीपुरातील जयभीम चौकात दोन गटात झालेल्या मारामारीत एकाचा खून तर दाेघे गंभीर जखमी (injured) झाले. वैभव नाईक अशी मृत्यूमुखी पडलेल्याचे नाव असून ताे तुरुंगातून (jail) पॅरोलवर बाहेर आला हाेता.

या घटनेत सुहास अनिल खैरकार (वय २६, राहणार अशोकनगर) तसेच नयन नरेश सौदागर (वय २२, राहणार विठ्ठलवाडी, यवतमाळ) अशी गंभीर जखमी झालेल्यांची नावे आहेत

यवतमाळच्या पाटीपुरा येथील जयभीम चौकात सात ते आठ जण दारु पित बसले हाेते. यावेळी दोघांत वाद झाला. हा वाद मिटवण्यासाठी दोन्ही गट आमने सामने आले. त्यातून शाब्दिक चकमक उडाली. त्यानंतर दहा जणांच्या टोळक्याने तिघांवर हल्ला केला. या हल्ल्यात वैभव नाईक मृत्यूमुखी पडला. तसेच सुहास खैरकार आणि नयन सौदागर दोघे गंभीर झाले.

यवतमाळ शहर पोलिसांनी (yavatmal city police) या प्रकरणाचा तपास करुन पहाटेच्या सुमारास दहा जणांवर गुन्हा दाखल केला आहे

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here