हिंगणा दिनांक 10 एप्रिल ( प्रतिनिधी)
मागील 56 वर्षापासून राम नवमीच्या दिवशी नागपूर शहरात शोभायात्रेचे आयोजन करणारे रामकृष्ण पोद्दार यांच्या कार्याचा गौरव करीत सार्थक फाउंडेशन नागपूर तर्फे त्यांच्या निवासस्थानी जाऊन सत्कार करण्यात आला.
1967 साली रामकृष्ण पोतदार यांनी नागपूर शहरात राम नवमीच्या दिवशी शोभायात्रा काढण्यास सुरुवात केली व या शोभायात्रेची सुरुवात दरवर्षी पोद्दारेश्वर राम मंदिर येथून केली जात असून त्याचे विधिवत पूजन नागपूर शहरांच्या महापौरांच्या हस्ते करण्यात येते.
या शोभायात्रे करता 22 हजार स्वयंसेवक 17 लाख भाविकांच्या सेवेत दरवर्षी असतात या शोभायात्रेच्या आयोजनाकरिता जवळपास 3500 संस्था एका ध्वजाखाली येऊन कार्य करतात. हीच बाब लक्षात घेऊन सार्थक फाउंडेशन तर्फे रामकृष्ण पोद्दार यांचा सपत्नीक सत्कार करण्यात आला.
यावेळी सार्थक फाऊंडेशनचे महेश बंग, विनोद चतुर्वेदी, सुधीर बाहेती, संजय पालीवाल, अजय मल, पंकज महाजन, संजय लोया, राजेश अग्रवाल, कन्हैया मंत्री, शरद राठी, हेमंत शर्मा, दीपक अग्रवाल, योगेश मालपाणी, हरीश गुप्ता आदींसह सार्थक फाउंडेशनचे पदाधिकारी उपस्थित होते






