शुक्रवारी तलाव ते अशोक चौक हा रस्ता वाहतुकीसाठी बंद

0
9

नागपूर दिनांक 5 एप्रिल ( महानगर प्रतिनिधी)

वाहतूक परिमंडळ कॉटन मार्केट नागपूर शहर हद्दीतील शुक्रवारी तलाव ते अशोक चौक येथे नेशनल हायवे तर्फे मे स्ट्रक्चरल इंजिनीअरींग प्रा.लि. तर्फे डाव्या बाजूचे सिमेंन्ट रोडचे बांधकाम द्रिष्टी स्ट्रक्चलर इंजिनीअरींग प्रा.लि. कडून सहा महिन्याचे आत पूर्ण करण्यात येणार असून सिमेंट रोड बांधकाम दरम्यान वाहतूकीस अडथडा होऊ नये. या मार्गावर दिवस व रात्रभर व्यस्त वाहतूक असते. त्यासाठी नमूद कामाचे दरम्याने वाहतूकीचे नियमन व नियंत्रण ठेवणे आवश्यक आहे.

रस्त्यावर वाहतूकीची कोंडी निर्माण होवू नये तसेच रोडवर गंभीर व प्राणांतिक अपघात होवू नयेत, त्यावर प्रतिबंध व्हावा. या दरम्यान रोडवर वाहतूकीचे दृष्टीकोनातून अधिसूचना निर्गमित केली आहे. ही अधिसूचना 3 मे 2022 पर्यंत अंमलात राहील.

या रस्त्यावरील वाहतूक या प्रमाणे राहील. गणेशपेठ पोलीस स्टेशन, मॉडल मिल चौक ते काशीबाई चौक (अशोक चौक) पर्यंतची डाव्या बाजूने सिमेंट बांधकाम दरम्यान अशोक चौकाकडून येणारी वाहतूक ही रोडच्या दुसऱ्या बाजूने गणेशपेठ पोलीस स्टेशनकडे जाईल परंतू जड वाहने (बस, ट्रव्हल्स, ट्रक) ही अशोक चौक, बैद्यनाथ चौक, जाधव चौक मार्गे जाईल.

कॉटन मार्केट कडून येणारी सर्व प्रकारची वाहतूक ही आग्याराम देवी चौक, जाधव चौक, बैद्यनाथ चौक अशोक चौक मार्गे जाईल किंवा गणेश टर्निग, टिळक पुतळा, शिवाजी चौक, रामकुलर चौक, अशोक चौक मार्गे जाईल.

चिटणीस पार्क कडून येण्णारी संपूर्ण वाहतूक ही टिळक पुतळा, शिवाजी चौक, रामकुलर चौक, अशोक चौक मार्गे जाईल किंवा टिळक पुतळा, आग्याराम देवी चौक, बैद्यनाथ चौक, जाधव चौक, अशोक चौक मार्गे जाईल.

जाधव चौक ते मॉडेल मील चौकाकडून अशोक चौकाकडे जाणीरी वाहतूक ही वैद्यनाथ चौक, अशोक चौक मार्गे जाईल किंवा आग्याराम देवी चौक, टिळक पुतळा, शिवाजी चौक या पर्यायी मार्गाने जाईल. कंत्राटदार सुरळीत व सुरक्षित वाहतूक नियमनाकरीता आवश्यक वाहतूक सुरक्षा रक्षक नेमून आवश्यक सुरक्षात्मक उपाययोजना करतील.

नागपूर शहरातील सर्व वाहन चालकांनी या अधिसूचनेचे पालन करण्याचे आव्हान करण्यात येते

 

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here