वाशिम, दि. 11 मार्च (प्रतिनिधी) :
सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागाच्या 2 डिसेंबर 2021 च्या शासन निर्णयान्वये दिव्यांग व्यक्तींना संगणकीय प्रणालीव्दारे ऑनलाईन दिव्यांग प्रमाणपत्र व वैश्वीक ओळखपत्र देण्यासाठी जिल्हा प्रशासनामार्फत विशेष मोहिम राबविण्याबाबत मार्गदर्शक सुचना देण्यात आल्या आहे.
त्याअनुषंगाने जिल्हाधिकारी व जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्या मार्गदर्शनाखाली समाज कल्याण विभाग व दिव्यांग शाळा यांच्या विद्यमाने 9 मार्च 2022 रोजी जिल्हा सामान्य रुग्णालय येथे दिव्यांग व्यक्तींना दिव्यांग प्रमाणपत्र व वैश्वीक ओळखपत्र उपलब्ध करुन देण्याकरीता शिबीराचे आयोजन करण्यात आले होते.
या शिबीरामध्ये 200 पेक्षा जास्त दिव्यांग व्यक्तींनी सहभाग नोंदविला असे जिल्हा परिषदेचे जिल्हा समाज कल्याण अधिकारी यांनी कळविले आहे.






