वाशिम दि.03 फेब्रुवारी (दीपक भारुका)
राज्यपाल भगतसिंह कोश्यारी हे शनिवार ५ फेब्रुवारी रोजी जिल्ह्याच्या दौऱ्यावर येत आहे.त्यांचा दौरा कार्यक्रम पुढीलप्रमाणे.५ फेब्रुवारी रोजी सकाळी ९ वाजता बुलढाणा जिल्ह्यातील लोणार येथून मोटारीने मालेगाव तालुक्यातील शिरपूर (जैन) कडे प्रयाण.
सकाळी १०.१५ वाजता शिरपुर(जैन) येथे आगमन व जैन मंदिराला भेट व दर्शन.सकाळी १०.४५ वाजता शिरपूर( जैन) येथून वाशिमकडे प्रयाण.सकाळी ११.१५ वाजता शासकीय विश्रामगृह,वाशिम येथे आगमन व अधिकाऱ्यांशी चर्चा. दुपारी २ वाजता शासकीय विश्रामगृह येथून कारंजा( लाड ) कडे प्रयाण. दुपारी ३.१० वाजता शासकीय विश्रामगृह कारंजा येथे आगमन व तेथून गुरुमंदिरकडे प्रयाण.दुपारी ३.१५ वाजता गुरुमंदिर येथे आगमन व दर्शन. दुपारी ३.४५ वाजता गुरुमंदिर येथून मोटारीने अमरावतीकडे प्रयाण करतील.






