गेल्या 24 तासात 456 पॉझिटिव्ह ,253 कोरोनामुक्त ; एक मृत्यू

0
13

यवतमाळ दि. 26 जानेवारी (प्रतिनिधी)

जीएमसी, डीसीएचसी व खाजगी रुग्णालयात 1674 बेड उपलब्ध

* ॲक्टीव्ह पॉझिटीव्ह 2070

 

गेल्या 24 तासात जिल्ह्यात 456 नवीन कोरोना पॉझिटिव्ह रूग्ण आढळून आले तर 253 जण कोरोनामुक्त झाले आहेत. सध्या ॲक्टीव्ह पॉझिटीव्ह रुग्णांची संख्या जिल्ह्यात 2039 व बाहेर जिल्ह्यात 31 अशी एकूण 2070 झाली असून त्यातील 91 रूग्ण रूग्णालयात तर 1979 गृहविलगीकरणात आहेत.

जिल्हा परिषद आरोग्य विभागातर्फे प्राप्त अहवालानुसार आज एकूण 1690 जणांचे रिपोर्ट प्राप्त झाले. यापैकी 456 अहवाल पॉझिटिव्ह असल्याने उर्वरित 1234 जणांचे रिपोर्ट निगेटिव्ह आले आहेत. जिल्ह्यात आतापर्यंत एकूण पॉझेटिव्ह रुग्णांची संख्या 76479 आहे तर बरे झालेल्यांची एकूण संख्या 72618 आहे. जिल्ह्यात कोरोनामुळे एकूण 1791 मृत्यूची नोंद आहे. आज मृत झालेल्यांमध्ये बाजोरीया नगर, यवतमाळ येथील 68 वर्षीय पुरूषाचा समावेश आहे.

आज पॉझिटिव्ह आलेल्या 456 रूग्णांमध्ये 151 महिला व 305 पुरूष असून त्यात आर्णी तालुक्यात चार, बाभुळगाव 26, दारव्हा 21, दिग्रस 49, घाटंजी 21, कळंब 11, नेर 53, पांढरकवडा 44, पुसद 30, राळेगाव आठ, उमरखेड एक, वणी 17, यवतमाळ 160, झरी जामणी पाच व इतर जिल्ह्यातील सहा रूग्णांचा समावेश आहे.

जिल्ह्यात आतापर्यंत आठ लाख 14 हजार 615 चाचण्या झाल्या असून त्यापैकी सात लक्ष 37 हजार 960 निगेटिव्ह आहेत. सद्यस्थितीत जिल्ह्याचा पॉझिटीव्हीटी दर 9.39 असून दैनंदिन पॉझिटीव्हीटी दर 26.98 आहे तर मृत्यूदर 2.34 आहे.

जीएमसी, डीसीएचसी व खाजगी रुग्णालयात 1674 बेड उपलब्ध : जिल्ह्यातील शासकीय वैद्यकीय महाविद्यालय, 11 डेडीकेटेड कोव्हीड हेल्थ सेंटर आणि 7 खाजगी कोव्हीड हॉस्पीटलमध्ये एकूण बेडची संख्या 1769 आहे. यापैकी 95 बेड रुग्णांसाठी उपयोगात असून 1674 बेड उपलब्ध आहेत. यात शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात एकूण 787 बेडपैकी 89 बेड रुग्णांसाठी उपयोगात असून 698 बेड शिल्लक, 11 डीसीएचसीमध्ये एकूण 755 बेडपैकी 6 बेड उपयोगात असून 749 बेड शिल्लक आणि 7 खाजगी कोव्हीड रुग्णालयात एकूण 227 बेडपैकी पुर्ण 227 बेड शिल्लक आहेत.

कोरोना रुग्णसंख्येत सगळीकडे वाढ होत असून नागरिकांनी मास्कचा वापर, वारंवार हात धुणे व सुरक्षीत अंतर राखणे या कोरोना त्रीसुत्री नियमांचे पालन करावे, तसेच कोरोनाचे लसीकरण पुर्ण करून स्वत:ची काळजी घ्यावी, असे आवाहन जिल्हाधिकारी अमोल येडगे यांनी केले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here