वर्धा : भीषण अपघात,7 मेडिकलच्या विद्यार्थ्यांचा जागीच मृत्यू, आमदाराच्या मुलाचाही समावेश

0
16

वर्धा : दिनांक 25 जानेवारी (प्रतिनिधी)

चारचाकी एक्सयुव्ही (SUV Car) वाहनावरून नियंत्रण सुटल्याने एक भीषण अपघात (Major Accident in Wardha) झाला आहे. अपघातात मेडिकल कॉलेजच्या सात विद्यार्थ्यांचा जागीच मृत्यू (7 Medical Student Killed in a Car Accident) झाला, देवळी येथून वर्धेला येत असताना सेलसुरा जवळ अपघात झाला आहे.

वाहनावरून नियंत्रण सुटल्याने सेलसुरा जवळील नदीच्या पुलावरून खाली वाहन खाली कोसळलंय. जवळपास 40 फूट पुलावरून चारचाकी वाहन खाली पडल्याने भीषण अपघात झाला आहे. सर्व मृतक 25 ते 35 वयोगटातील असल्याची माहिती आहे. रात्री एक वाजताच्या जवळपास अपघात झाला असून पहाटे चार वाजेपर्यंत मृतदेह बाहेर काढण्याचे काम सुरु होते.

सर्व सातही मेडिकलच्या विद्यार्थ्यांना अपघाताची बातमी ऐकून सगळ्यांनाच हादरा बसला आहे. सातही विद्यार्थ्यांच्या कुटुंबीयांवर दुःखाचा डोंगर कोसळला असून यामध्ये महाराष्ट्रातील एका भाजप आमदाराच्या मुलाचाही मृतांमध्ये समावेश आहे. आविष्कार रहांगडाले असं मृत विद्यार्थ्याचं नाव असून तो तिरोड्याचे आमदार विजय रहांगडाले यांचा मुलगा आहे. आविष्कार मेडिकलच्या पहिल्याच वर्षाला होता. कॉलेजच्या मित्रांसोबत बर्थडे पार्टीला गेलेल्या आविष्कारवरही काळानं घाला घातला आहे.

दरम्यान, अपघाताच्या घटनेची माहिती मिळताच वर्ध्याचे उपविभागीय पोलिस अधिकारी पियुष जगताप, सावंगी पोलिसी निरीक्षकही घटनास्थळी तातडीनं दाखल झाले आहे. या अपघातात मृत्यू झालेल्यांमधील सर्व विद्यार्थी हे सावंगी येथील मेडिकल कॉलेजचे विद्यार्थी असल्याची माहिती समोर आली आहे. दरम्यान, अपघातात दगावलेल्यांचे मृतदेह वर्धा सामान्य रुग्णालयात शवविच्छेदनासाठी आणण्यात आल्याचीही माहिती समोर आली आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here