वर्धा दिनांक 23 जानेवारी (प्रतिनिधी)
वर्धा जिल्ह्यातील आर्वी येथील गर्भपात प्रकरणामुळे अवघ्या महाराष्ट्रात खळबळ उडाली होती. आता या प्रकरणी दररोज नवनवीन खुलासे होते.
बडतर्फ केलेल्या आरोपी डॉ. नीरज कदम याच्या घराची झाडाझाडती घेतली असता खोलीत लोखंडी पेटीत कुबेराचा खजिना सापडला असून पैसे मोजायला पोलिसांना तब्बल नऊ तास लागले
आर्वी येथील गर्भपात प्रकरणात (Abortion case at Arvi) पोलिसांनी कदम (police action ) यांच्या घरातील सील केलेल्या खोलीला उघडत तपासणी केली.
याचदरम्यान पोलिसांना एका कपाटात जुन्या लोखंडी पेटीत बॅगमध्ये मोठ्या प्रमाणात रक्कम आढळली. पोलिसांना ही रक्कम मिळाली. 9 तास याचा मोजमाप सुरू होते. ही रक्कम तब्बल 97 लाख 42 हजार 772 रुपये असल्याचं समोर आलंय. पोलिसांना ही रक्कम मोजण्यासाठी तब्बल 9 तास लागले आहे. एवढ्या मोठ्या प्रमाणात रक्कम आढळली. पोलिसांनी आयकर विभागाला (income tax department) पत्र देत सूचना दिल्या आहे.
कदम कुटुंबीयाकडून त्या खोलीची चावी पोलिसांना सुपूर्द केली गेली, पोलिसांनी खोली उघडून त्यात काही कागदपत्रं किंवा महत्वाचे पुरावे मिळतात काय, याची तपासणी केली. खोलीत पाच ते सहा कपाटं दिसून आली. पोलिस कपाटं उघडून तपासणी करत असताना त्यात पोलिसांना एक लोखंडी पेटी आढळली. त्यात जवळपास तीन बॅगमध्ये पोलिसांना रक्कम आढळली. मशीनच्या मदतीने पोलिसांनी रक्कम मोजली. यात 97 लाख 42 हजार 772 रुपये आढळल्याचे पोलीस निरीक्षक भानुदास पिदुडकर यांनी सांगितलं. ही रक्कम आली कुठून, कुणाची आहे, याचा शोध पोलिसांसह आयकर विभाग घेणार असल्याची माहिती आहे. पोलिसांनी आयकर विभागाला माहिती सुद्धा दिली आहे
आर्वी येथील अल्पवयीन मुलीच्या गर्भपात प्रकरणाने संपूर्ण महाराष्ट्र हादरून गेले. या प्रकरणात पोलिसांनी तपास करत एकूण सहा लोकांना अटक केली आहे. याच प्रकरणाचा तपास करत असताना पोलिसांनी कदम याचे रुग्णालयावर असलेल्या घरात पहिले तपासणी केली होती






