राष्ट्रीय शैक्षणिक धोरण मातृभाषेच्या संदर्भात महात्मा गांधींच्या ‘नई तालीम’ चे अनुकरण करते : उपराष्ट्रपती

0
13

 

वर्धा, दि.4 (प्रतिनिधी) : देशाचे राष्ट्रीय शैक्षणिक धोरण हे महात्मा गांधींच्या ‘नई तालीम’ चे अनुकरण करते. राष्ट्रीय शैक्षणिक धोरणात प्राथमिक किंवा माध्यमिक शाळांमध्ये् शिक्षणाचे माध्यम म्हणून मातृभाषा ठेवण्याचाही प्रस्ताव आहे आणि विद्यार्थ्यांमध्ये उद्योजकता वाढवण्यासाठी कौशल्य प्रशिक्षणावर भर देण्यात आला आहे. महात्मा गांधींनी 1937 मध्ये वर्धा येथेच प्रस्तावित केलेल्या ‘नई तालीम’ मध्ये मोफत व अनिवार्य शिक्षणासोबतच मातृभाषेला शिक्षणाचे माध्यम बनवणे आणि विद्यार्थ्यांना कौशल्य प्रशिक्षण देणे यांचा समावेश होता, असे प्रतिपादन उपराष्‍ट्रपती एम. वेंकैया नायडू यांनी केले.

वर्धा येथील महात्मा गांधी आंतरराष्ट्रीय हिंदी विद्यापीठाच्या रौप्य महोत्सवी समारंभाला आभासी माध्य मातून संबोधित करत होते. यावेळी त्यांनी बाबासाहेब डॉ. भीमराव आंबेडकर यांच्या पुतळ्याचे अनावरण तसेच अटलबिहारी वाजपेयी भवन व चंद्रशेखर आझाद वसतिगृहाचे उद्घाटन रिमोट दाबून केले.

नायडू म्हणाले की, संविधान सभेने प्रदीर्घ चर्चेनंतर हिंदीला अधिकृत भाषा म्हणून स्वीकारले आणि आठव्या अनुसूचीमधे इतर भारतीय भाषांनाही घटनात्मक दर्जा दिला. प्रत्येक भारतीय भाषेचा गौरवशाली इतिहास आहे, समृद्ध साहित्य आहे. आपल्या देशात भाषिक विविधता आहे, हे आपले भाग्य होय. आपली भाषिक विविधता ही आपली ताकद आहे, कारण आपल्या भाषा आपली सांस्कृतिक एकता व्यक्त करतात.

गांधीजींचे ‘नई तालीम’, त्यांच्या अनुभवांवर केलेले संशोधन आणि विद्यापीठाने केलेले राष्ट्रीय अभ्यास शैक्षणिक धोरणाच्या अंमलबजावणीसाठी उपयुक्त ठरू शकतात, असे उपराष्ट्रपती म्हणाले. महात्मा गांधींसाठी भाषेचा प्रश्न हा देशाच्या एकात्मतेचा प्रश्न होता. राष्ट्रभाषेशिवाय राष्ट्र मूक आहे, अशी त्यांची धारणा होती.

हिंदीचा आग्रह असतानाही महात्मा गांधींनी प्रत्येक नागरिकाची मातृभाषेबद्दलची संवेदनशीलता समजून घेतली. सुसंस्कृत समाजाची भाषा सभ्य, सुसंस्कृत आणि सर्जनशील असावी. साहित्य लेखनातून सभ्य संवाद समाजात रुजवावा, वाद निर्माण करू नये, ही संस्कृती विद्यापीठांनी रुजवावी, अशी त्यांची अपेक्षा होती. भाषेच्या मर्यादा आणि समाजाच्या शिस्तीत राहून अभिव्यक्ती स्वातंत्र्याचा वापर करूया, असे नायडू म्हाणाले.

डॉ. आंबेडकर जीवनभर शिक्षण आणि समतेसाठी कटिबद्ध राहिले. त्यांच्या जीवन संघर्षात शिक्षणाने त्यांना मार्गदर्शन केले. डॉ.आंबेडकरांचा पुतळा विद्यापीठातील शिक्षक व विद्यार्थ्यांसाठी प्रेरणास्तंभ म्हणून कायम राहील, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. माजी पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी यांच्या हिंदी सेवेचे स्मरण करून  नायडू म्हणाले की, परराष्ट्र मंत्री म्हणून आदरणीय अटलजींनी पहिल्यांदाच संयुक्त राष्ट्र महासभेला हिंदीत संबोधित केले. वर्षानुवर्षे ती परंपरा नियमितपणे पाळली जात असल्याबद्दल त्यांनी समाधान व्यक्त केले.

अमर क्रांतिकारी चंद्रशेखर आझाद वसतिगृहाचे लोकार्पण करताना स्वातंत्र्यलढ्यातील तरुण क्रांतिकारकांच्या धैर्याची जाणीव देशातील तरुण पिढीला झाली पाहिजे, असे सांगितले. विश्वविद्यालयाने हिंदी साहित्यातील अनेक प्रसिद्ध कलाकृती ऑनलाइन उपलब्ध करून दिल्या आहेत. हिंदीसोबतच इतर भारतीय भाषांमधील साहित्यही ऑनलाइन उपलब्ध करून दिले पाहिजे. हिंदी विद्यापीठात फ्रेंच, स्पॅनिश, चायनीज, जपानी या परदेशी भाषा हिंदी माध्यमात शिकविल्या जात आहेत. याबद्दल आनंद व्यक्त करून श्री नायडू यांनी या सुविधेत इतर भारतीय भाषांचा समावेश करण्याचे आवाहन केले.

वर्ध्याची पवित्र भूमी महात्मा गांधी आणि विनोबा भावे यांच्या जीवन तत्वज्ञानाची साक्षीदार आहे. वर्धा हे देशाचे प्रेरणास्थान आहे. हिंदी भाषेची सहजता यावर उपराष्ट्रवपती म्हसणाले की कुलगुरू प्रो. रजनीश कुमार शुक्ल यांच्याप सारखी सोपी व बोधप्रद भाषेची देशाला गरज आहे. विश्वषविद्यापीठांनी अशा प्रकारच्याक भाषेच्याे विकासावर लक्ष केंद्रीत केले पाहिजे. यावेळी उपराष्ट्रपतींच्या हस्ते महात्मा गांधी आंतरराष्ट्रीय हिंदी विद्यापीठाच्या रौप्य महोत्सवी स्मृतिचिन्हाचे अनावरणही करण्यात आले.

यावेळी केंद्रीय सामाजिक न्याय व सक्षमीकरण राज्यमंत्री रामदास आठवले यांनी बाबासाहेबांनी समाजात समानता आणण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न केले व राष्ट्रवादाची भूमिका बजावली. भारतीय राज्यघटना ही आपल्या सर्वांसाठी अभिमानाची बाब आहे, असे सांगितले.

यावेळी विद्यापीठाचे कुलगुरू प्रा. रजनीश कुमार शुक्ल यांनी स्वागत व प्रास्ताविक केले. विद्यापीठाच्या इतिहासात 25 वे वर्ष अत्यंत महत्त्वाचे आहे, असे प्रा.शुक्ल म्हणाले. उपराष्ट्रपती यांचे स्वागत कुलगुरूंचे प्रतिनिधी म्हपणून दूरशिक्षण संचालनालयाचे संचालक डॉ. के. बालराजू यांनी भौतिक रूपाने विद्यापीठाचे स्मृती चिन्ह, शाल आणि सूतमाला देऊन केले.

कार्यक्रमाचे संचालन कुलसचिव कादर नवाज खान यांनी केले तर आभार प्रकुलगुरू प्रो. हनुमानप्रसाद शुक्ल यांनी मानले. यावेळी वर्ध्याचे खासदार रामदास तडस ऑनलाईन तर विधान परिषदचे सदस्य डॉ. रामदास आंबटकर, जिल्हा परिषदेच्याी अध्यक्षा सरिता गाखरे, जिल्हाधिकारी प्रेरणा देशभ्रतार यांच्यासह विद्यापीठातील अनेक मान्यवर, शिक्षक व विद्यार्थी प्रत्यक्ष उपस्थित होते. कार्यक्रमाची सुरुवात आणि सांगता राष्ट्रगीताने झाली.

 

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here