अभिनेता रितेश देशमुख, जेनेलिया डिसूजा दोन मुलांसह ताडोबात

0
9

चंद्रपूर दिनांक 29 डिसेंबर (विशेष प्रतिनिधी)

जगप्रसिद्ध ताडोबा-अंधारी व्याघ्र प्रकल्पामध्ये भारतीय अभिनेता आणि चित्रपट निर्माता  रितेश विलासराव देशमुख व त्यांची पत्नी जेनेलिया डिसूझा व मुलगा रियान आणि राहिल आणि दोन मित्रासह जगप्रसिद्ध ताडोबा मध्ये व्याघ्र दर्शन करण्या करिता ताडोबात आगमन झाले आहे

आज 29 दिसंबर रोज ताडोबा (कोअर) खुटवंडा गेटवरुन सकाळ फेरी करिता गेले असता त्यांना वाघाचे दर्शन सोडून इतर प्राण्यांचे दर्शन झाले. दोन दिवसाच्या मुकामी असल्यामुळे बाकी असलेल्या सफारी मध्ये व्याघ्र दर्शन होण्याची शक्यता आहे असे तेथील पर्यटक मार्गदर्शक यानी त्यांना सांगितले

यापूर्वी प्रसिद्ध क्रिकेटर सचिन तेंडुलकर ही आपल्या कुटुंबासह ताडोबात भ्रमण करून गेले आहे

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here