कोणीही घरापासून वंचित राहू नये – पालकमंत्री सुनील केदार

0
9

वर्धा, दि. 17 (प्रतिनिधि) :

शासनाच्यावतीने सर्वांसाठी घरे हा कार्यक्रम राबविण्यात येत आहे. या कार्यक्रमांतर्गत एकही गरजु आणि पात्र लाभार्थी घरापासून वंचित राहू नये. घरकुलांसाठी काही आर्थिक तरतुद करावी लागत असेल तर ती उपलब्ध करून देऊ, असे पालकमंत्री सुनील केदार यांनी सांगितले.

महाआवास अभियान ग्रामीण अंतर्गत पालकमंत्र्यांच्याहस्ते जिल्हा परिषदेच्या सभागृहात जिल्हास्तरीय पुरस्काराचे वितरण करण्यात आले. त्यावेळी ते बोलत होते. यावेळी आ.रणजित कांबळे, जिल्हा परिषद अध्यक्षा सरिता गाखरे, उपाध्यक्षा वैशाली येरावार, कृषि सभापती माधव चंदनखेडे, जिल्हाधिकारी प्रेरणा देशभ्रतार, मुख्य कार्यकारी अधिकारी डॅा.सचिन ओम्बासे, अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी सत्यजित बडे आदी उपस्थित होते.

स्वातंत्र्याचे 75 वर्ष आपण साजरे करतो आहे. स्वातंत्र्याच्या इतक्या वर्षानंतरही कोणी घरा शिवाय राहत असेल ती योग्य बाब नाही. प्रत्येकाला घर मिळाले पाहिजे. लाभार्थ्यांना घरकुल मंजुर केल्यानंतर ते पुर्ण करून घेण्याची जबाबदारी सुध्दा आपलीच आहे. यासाठी जिल्हा परिषद सदस्य, सरपंच, ग्रामसेवक, ग्रामपंचायत सदस्य यांनी पुढाकार घेणे आवश्यक आहे. जिल्ह्यात लसिकरणाची मोहिम राबविण्यात येत आहे. जिल्ह्यात 90 टक्के लोकांना आपण पहिला डोज दिला आहे. दुसऱ्या डोजचे काम सुध्दा आपण चांगल्या पध्दतीने आणि गतीने करु, असे पालकमंत्री श्री.केदार पुढे बोलतांना म्हणाले.

आ.रणजित कांबळे, जि.प.अध्यक्षा सरिता गाखरे, जिल्हाधिकारी प्रेरणा देशभ्रतार यांचीही यावेळी भाषणे झाली. कार्यक्रमाचे प्रास्ताविक जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणेचे प्रकल्प अधिकारी विश्वास सिद यांनी केले तर आभार जि.प.बांधकाम विभागाचे अभियंता श्री.गोहाड यांनी मानले.

प्रधानमंत्री आवास योजना ग्रामीण अंतर्गत पुढील प्रमाणे पुरस्कार देण्यात आले. सर्वोत्कृष्ट तालुके – देवळी प्रथम क्रमांक, आष्टी व्दितीय क्रमांक, हिंगणघाट तृतीय क्रमांक. सर्वोत्कृष्ट ग्रामपंचायत – इंझाळा ता. देवळी प्रथम, आनंदवाडी ता. आष्टी व्दितीय, निरगुडी ता.समुद्रपूर तृतीय क्रमांक. सर्वोत्कृष्ट क्लस्टर – राहुल वैद्य इंझाळा ता. देवळी प्रथम, श्याम खारकर आनंदवाडी ता.आष्टी व्दितीय, सागर फिरंगी निरगुडी ता.समुद्रपुर तृतीय क्रमांक. सर्वोत्कृष्ट वित्तीय संस्था – नारीशक्ती प्रभाग संघ, सिंदी विहिरी ता. कारंजा प्रथम, हिरकणी प्रभाग संघ, अंदोरी ता. देवळी व्दितीय, एकता प्रभाग संघ साहुर, ता. आष्टी तृतीय क्रमांक.

राज्य पुरस्कृत आवास योजना ग्रामीण अंतर्गत पुढील प्रमाणे पुरस्कार देण्यात आले. सर्वोत्कृष्ट तालुके – देवळी प्रथम क्रमांक, समुद्रपूर व्दितीय, हिंगणघाट तृतीय क्रमांक. सर्वोत्कृष्ट ग्रामपंचायत – मांडगाव ता. समुद्रपुर प्रथम, सिंदी (मेघे) ता. वर्धा व्दितीय, फत्तेपूर ता. देवळी तृतीय क्रमांक. सर्वोत्कृष्ट क्लस्टर – समानता प्रभाग संघ मांडगाव, ता. समुद्रपूर प्रथम, परिवर्तन प्रभाग संघ हिंगणी, ता. सेलू द्वितीय, सार्थक प्रभाग संघ वायफड ता. वर्धा तृतीय क्रमांकाचा पुरस्कार देण्यात आला. या सर्वांना पालकमंत्र्यांच्याहस्ते सन्मानचिन्ह व प्रशस्तीपत्र देऊन गौरविण्यात आले.

 

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here