अमरावती दिनांक 13 नोव्हेंबर (विशेष प्रतिनिधी)
अमरावती मध्ये काल झालेल्या हिंसाचारानंतर आज सकाळी आंदोलनकर्त्यांकडून मोठ्या प्रमाणावर तोडफोड करण्यात आली विशेषत आयात दुकाने आणि वाहनांची मोठ्या प्रमाणावर तोडफोड करण्यात आली आहे , मोठ्या संख्येने जमाव राजकमल चौकात जमा आहे
मोठ्या संख्येने पोलिस फोर्सची तैनाती करण्यात आली असून ते परिस्थितीवर नियंत्रण मिळविण्यासाठी प्रयत्न करीत असल्याचे दिसून येत आहे
त्रिपुरामध्ये मस्जिद पाडल्याच्या कथित घटनेचा निषेध करण्यासाठी अमरावती मध्ये काल मुस्लिम बांधवानी आपली दुकाने बंद ठेवली व घटनेचा निषेध केला होता. निषेध करण्यासाठी काढण्यात आलेल्या15 ते 20 हजार लोकांच्या या मोर्चाला हिंसक वळण लागले होते
यावेळी मोर्चा करांनी जयस्तंभ चौकातील व शहरातील विविध भागातील 20 ते 22 दुकानांची प्रचंड तोडफोड केली तसेच एका दुचाकीचीही तोडफोड केली होती.
दरम्यान पोलीस व आंदोलक आमने सामने देखील आले होते व यात दोन पोलीस कर्मचारी दगडफेक झाल्याने जखमी झाले होते






