राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आणि भारतीय जनता पार्टी एकत्र येणार नाहीत :प्रफुल्ल पटेल

0
14

केंद्रीय गृहमंत्री अमित शाह आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रमुख शरद पवार यांची अहमदाबादेत भेट झाल्याचा दावा सध्या केला जात आहे.भेटीवेळी राष्ट्रवादीचे नेते प्रफुल्ल पटेलही उपस्थित होते असं सांगितलं जात आहे. दरम्यान, या भेटीच्या चर्चेवर आता प्रफुल्ल पटेल यांनी स्पष्टीकरण दिलं आहे.

राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आणि भारतीय जनता पार्टी एकत्र येणार या चर्चा चुकीच्या आहेत. उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वात महाराष्ट्रातील महाविकास आघाडी सरकार स्थिर आणि सुरक्षित आहेत. महाराष्ट्रातील महाविकास आघाडी सरकारचा पाया शरद पवार यांनीच रचला आहे. त्यामुळे अशा चर्चांमध्ये काही तथ्य नसल्याचं पटेल यांनी म्हटलंय.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here