बिबट्याने लोकांवर हल्ला केला ही केवळ अफवा

0
10

वर्धा दिनांक 25 ऑक्टोबर (जिला प्रतिनिधी)

आज सकाळी सांवगी रूग्णालयात बिबट्या वाघ शिरला होता हा वाघ मादा असून हिचे वय दिड वर्षे असल्याची माहिती मायभूमि न्यूज ला मिळाली आहे

रुग्णालयात शिरलेल्या बिबट्याने माणसांवर हल्ला केल्याची केवळ अफवा असून हल्याची कोणतीही घटना घडलेली नाही. याउलट वनविभागाची रेस्क्यू टीम आणि पिपल फाॅर अॅनिमल्सच्या कार्यकर्त्यांनी समर्थपणे परिस्थिती हाताळत बिबट्याला ताब्यात घेण्याची मोहीम यशस्वीरित्या पार पाडली.

या घटनेत नागरिक आणि बिबट यापैकी कोणालाही कोणतीही दुखापत झालेली नाही. कालच्या भारत पाकिस्तान क्रिकेट सामन्याच्या दरम्यान वातावरण सामसूम असताना आणि रस्त्यावरील वाहतूक मंदावली असताना सदर बिबट रस्ता ओलांडून रुग्णालय परिसरात शिरला असण्याची शक्यता आहे. अंदाजे दीड वर्षाच्या या मादी बिबटला गुंगी देऊन ताब्यात घेण्यात आले आहे.

सध्या ही मादा डाॅक्टरांच्या देखरेखीखाली असून ती नाॅर्मल होताच जंगलात तिच्या अधिवासात सुरक्षितपणे सोडण्यात येईल असे मानद वन्य जिव रक्षक यांनी मायभूमि न्यूजशी बोलताना सांगितले

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here