वाशीम जिल्ह्यात आज पाच कोरोना बाधित

0
7

वाशीम प्रतिनिधि 19 अक्टूबर

गेल्या जिल्ह्यात काही दिवसापासून कोरोना रुग्णांची संख्या 0 ते 2 च्या आकड्यात आहे. मात्र, 19 सप्टेंबर रोजी यामध्ये वाढ होवून 5 जण कोरेाना बाधित आढळल्याने प्रशासनासह नागरिकामध्ये चिंता व्यक्त केल्या जात आहे. तिसर्‍या लाटेचा धोका पाहता प्रशासनाने गांभीर्याने घेण्याची गरज आहे.

जिल्ह्यात गेल्या महिन्याभरापासून कोरोना बाधित व्यक्तीचे प्रमाण कमी झाले असले तरी 19 ऑक्टोबर रोजी 5 जणांचा कोरोना विषयक अहवाल सकारात्मक आला आहे. त्याच दरम्यान जिल्ह्याबाहेर एका व्यक्तीची नोंद झाली आहे.

कारंजा तालुक्यातील पाच जण कोरोना बाधित आढळले असून, इतर तालुक्यात बाधितांचा आकडा निरंक आहे. जिल्ह्यातील नागरिकांचे लसीकरण पुर्ण करण्यासाठी आरोग्य विभागाने विशेष भर दिला. जिल्ह्यातील एकुण बाधितांची संख्या 41,765 झाली तर 41,115 रुग्ण उपचाराने बरे झाले असून, 639 जणांचा मृत्यू झाला. सद्यस्थितीत 5 रुग्ण उपचार घेत आहेत.

कोरोनाची दूसरी लाट ओसरत असली तरी तिसर्‍या लाटेची शक्यता वर्तविण्यात येत असल्याने नागरिकांनी आवश्यक ती काळजी घ्यावी, असे आवाहन जिल्हा प्रशासन व आरोग्य विभागाने केले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here