यवतमाळात 4 पोलिस निरीक्षकांसह 12 अधिकार्‍यांच्या बदल्या

0
20

यवतमाळ जिल्हा पोलिस दलात बदल्यांचे सत्र सुरूच असून बुधवार, 29 सप्टेंबर रोजी 4 पोलिस निरीक्षकांसह 12 अधिकार्‍यांच्या बदल्या करण्यात आल्या. यात 2 बदल्या कर्तव्यात कसूर केल्याप्रकरणी तर इतर बदल्या प्रशासकीय कारणांवरून करण्यात आल्या आहेत.

जिल्हा पोलिस आस्थापन मंडळाच्या बैठकीत यवतमाळ शहर ठाणेदार प्रदीप शिरस्कार यांची बदली पोलिस नियंत्रण कक्षात करण्यात आली आहे. नियंत्रण कक्षातील प्रकाश तुनकलवार यांना जिल्हा विशेष शाखा येथे करण्यात आली आहे. जिविशा येथे कार्यरत नंदकिशोर पंत यांची बदली शहर पोलिस ठाणेदार म्हणून करण्यात आली आहे. नियंत्रण कक्षातील दीपमाला भेंडे यांची बदली सायबरसेल तसेच अतिरिक्त कार्यभार म्हणून ‘डायल 112’ व निर्भया पथकात करण्यात आली आहे.

वणी पोलिस ठाण्यात भरोसा सेल येथे कार्यरत सहायक पोलिस निरीक्षक विजया पंधरे यांची बदली डायल 112 पोलिस नियंत्रण कक्षात करण्यात आली आहे. पुसद येथील वसंतनगर ठाण्यातील सुषमा बाविस्कर यांची बदली सुपरवायझर डायल 112 पोलिस नियंत्रण कक्ष, शिरपूरचे ठाणेदार सचिन लुले यांची पोलिस नियंत्रण कक्षात, स्थानिक गुन्हे शाखेतील गजानन करेवाड यांची शिरपूर ठाणेदार म्हणून तर सहायक पोलिस निरीक्षक राजू खारडे यांची बदली पुसद ग‘ामीण येथे करण्यात आली आहे. तसेच पोलिस नियंत्रण कक्षातील पोलिस उपनिरीक्षक प्रवीण हिरे यांची बदली पोलिस ठाणे वणी, पोलिस नियंत्रण कक्षातील किशोर खंडार यांची बदली आर्णी, तर दूरक्षेत्र सदोबासावळी येथे कार्यरत असलेल्या दीपक राणे यांची बदली दारव्हा पोलिस ठाण्यात करण्यात आली आहे

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here