एकाच कुटुंबातील चौघांची हत्या, गोंदिया हादरले

0
6

गोंदिया : जिल्ह्यात एकाच कुटुंबातील चौघांची हत्या झाल्याचे उघडकीस आल्याने संपूर्ण जिल्हा हादरला असून संपूर्ण कुटुंब संपल्याने हळहळ व्यक्त करण्यात येत आहे

तिरोडा तालुक्यात येणाऱ्या चुरडी येथे एकाच कुटुंबातील चौघांची हत्या करण्यात आल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. आज सकाळी १० वाजता ड्रायव्हर वाहन घेऊन जाण्यासाठी आला असता त्याला घरात ४ मृतदेह दिसून आले. एकाच कुटुंबातील चौघांचा खून हा व्यवसायातून झाला की संपत्तीतून झाला हे सांगता येत नाही. आतापर्यंत या खुनाचा उलगडा झाला नाही. एकाच कुटुंबातील चौघांची हत्या करणाऱ्या आरोपींमध्ये अनेक आरोपींचा समावेश असावा असा कयास लावला जात आहे.

गोंदिया जिल्ह्याच्या तिरोडा तालुक्यातील चुरडी येथील ट्रान्सपोर्ट व्यावसायीक रेवचंद डोंगरु बिसेन (५१), मालता रेवचंद्र बिसेन (४५), पौर्णिमा रेवचंद बिसेन (२०), तेजस रेवचंद बिसेन (१७) अशी एकाच कुटुंबातील मृत चौघांची नावे आहेत. रेवचंद डोंगरु बिसेन यांच्याकडे ३ मेटॅडोर व एक ट्रॅक्टर आहे. ते ट्रान्सपोर्टचे काम करतात. रेशनचे धान्य ट्रान्सपोर्ट करण्याचे काम ते करीत होते. २१ सप्टेंबरच्या पहाटे बिसेन कुटुंबियांच्या घरी अज्ञात मारेकऱ्यांनी प्रवेश करून साखर झोपेत असलेल्या लोकांच्या डोक्यावर ट्रॅक्टरच्या स्पेंडलने वार करून ठार केले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here