प्रवीण पोटे यांच्या महाविद्यालयात विजेचा शॉक लागून चौघांचा मृत्यु

0
16

अमरावती दिनांक 29 दिसंबर (प्रतिनिधि)

भाजपचे नेते आणि माजी राज्यमंत्री आमदार प्रवीण पोटे यांच्या अभियांत्रिकी महाविद्यालयात आज दुर्देवी घटना घडली. महाविद्यालयात रंगरंगोटी करत असताना चार कर्मचाऱ्यांना शॉक लागल्याने या कर्मचाऱ्यांचा जागीच मृत्यू झाला. त्यामुळे या परिसरात एकच खळबळ उडाली आहे.अमरावतीत प्रवीण पोटे यांचं पीआर पोटे इंजिनीयरिंग महाविद्यालय आहे.

या महाविद्यालयातील कर्मचारी महाविद्यालयाच्या मुख्य गेटची रंगरंगोटी करत होते. या गेटजवळून हायपॉवरची वायर गेली आहे. हे कर्मचारी शिडीवर चढून रंगरंगोटी करत असताना शिडीला विद्यूत तारेचा स्पर्श झाला. त्यामुळे त्यांना भयंकर शॉक लागला. त्यामुळे हे चारही कर्मचारी शिडीला चिकटले. त्यानंतर जोराचा झटका बसल्याने हे चारही कर्मचारी खाली कोसळले.

सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार या चारही जणांचा जागीच मृत्यू झाला आहे. त्यामुळे या परिसरात एकच खळबळ उडाली आहे. या घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here