महाराष्ट्र बंग परिवारा द्वारा संत नगरी शेगाव येथे 18व 19 डिसेंबर दोन दिवसीय खांडल माता वार्षिक उत्सवाचे आयोजन करण्यात आले होते. उत्सवाच्या पहिल्या सत्रात उत्सवाचे उद्घाटन व सत्कार समारंभ आयोजित करण्यात आला होता.
उद्घाटक म्हणून मुकुंदास बंग सिकंदराबाद तर कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी श्री खांडल माताजी अखिल भारतीय माहेश्वरी बंग परमार्थ ट्रस्ट चे माजी कोषाध्यक्ष महेश बंग मुंडवा राजस्थान हे होते तर प्रमुख उपस्थिती म्हणून मनोज बंग मुंडवा, रामनिवासजी बंग मुंडवा, रामानुज बंग कलकत्ता, गोपीकिसन बंग परभणी, गुलाबचंद बंग पुणे, डॉ सत्यनारायण बंग नांदेड, भवरलाल बंग लातूर, डॉ रमेशचंद्र डांगरा अध्यक्ष संत गजानन महाराज संस्थान शेगाव, सुनील सोमाणी प्राचार्य इंजिनिअरिंग कॉलेज शेगाव, नरेश मल, डॉ आनंद राठी खामगांव, प्रदीप भूतडासोनाला, आदी मान्यवर मंचकवर उपस्थित होते.
हे दोन दिवसीय उत्सव करण्यामागचे प्रयोजन आणि त्या विषयची भूमिका प्रास्ताविकातून हिंगणा नागपूर येथिल महेश बंग यांनी मांडली. तर अध्यक्षीय स्थानावरून बोलताना मुंडवा मारवाड येथून आलेले महेश बंग म्हणाले की यांनी कुलदेवतेच्या उत्सवाच्या माध्यमातून संपूर्ण देशातील बंग परिवार एकसंघ राहावा व मातेच्या वार्षिक उत्सवाच्या माध्यमातून आपली माणसं,आपली बोली,आपली भाषा, यांचे संवर्धन करून आपली संस्कृती जोपासण्याचे कार्य आपण या माध्यमातून करूया असे प्रतिपादन केले.
या उत्सवाचे औचित्य साधून हिंगणा, नागपूर येथील अरुणा महेश बंग यांनी देवी देवता व महाराष्ट्रातील थोर संत यांच्या आरत्या संकलित करून एक आरती सग्रह प्रकाशित केला त्या आरतीसंग्राहाचे मान्यवरांच्या हस्ते प्रकाशन करण्यात आले. तसेच बंग परिवाराची कुळ देवता मुंडवा राजस्थान येथील खांडल माता मंदिरास सहयोग करणाऱ्या महाराष्ट्रातील बंग परिवारांच्या सदस्यांचा व विविध क्षेत्रात नाव लौकिक करणाऱ्या महाराष्ट्रातील बंग परिवारातील सदस्यांचा मान्यवरांच्या हस्ते शाल स्मृतिचिन्ह, व पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला.
तर दुसऱ्या सत्रात संपूर्ण महाराष्ट्रातून एकत्रित झालेल्या बंग परिवारातील सदस्यांनी हितगुज करून परिवारा प्रति भावना व्यक्त करत असताना शब्दांना वाट मोकळी करून दिली, तर जेष्ठ सदस्यांनी आपल्या अनुभवातून परिवारातील तरुण सदस्यांना मार्गदर्शन केले.
उत्सवाच्या दुसऱ्या दिवशी कुलदैवत खांडल मातेचा अभिषेक करून यज्ञ करण्यात आले. व प्रसादा नंतर उत्सवाची सांगता करून एकमेकास निरोप देण्यात आला. या संपूर्ण उत्सवाचे सूत्रसंचालन अरुणा महेश बंग यांनी केले. तर आभार नवलकिशोर बंग वलगाव अमरावती यांनी मानले
उत्सवाच्या यशस्वितेकरिता महेश बंग हिंगणा नागपूर, नवलकिशोर बंग वलगाव, संपत बंग लातूर, जुगलकिशोर बंग मुंबई, डॉ. अशोक बंग वाशीम, शेखर बंग कारंजा, राजू बंग नागपूर, चेतन बंग औरंगाबाद, गणेश बंग नगर, ओमप्रकाश बंग नगर, हेमंत बंग अमरावती, विनोद बंग अमरावती, बन्सिलाल बंग देवळी, रामेश्वर बंग वलगाव, अरुणा बंग हिंगणा नागपूर, सीमा बंग पुणे, अनिता बंग वलगाव, सोनल बंग लातूर, स्वाती बंग परतवाडा, राधा महेश बंग नागपूर,अंजली बंग औरंगाबाद यांनी अथक परिश्रम घेतले सदर प्रथम वार्षिक उत्सवास महाराष्ट्रातील प्रत्येक जिल्हा व तालुक्यातील बंग परिवारातील 300 पेक्षा जास्त सदस्य उपस्थित होते.






