महाराष्ट्र बंग परिवार द्वारा आयोजत बंग परिवाराची कुळदेवता खांडल माता यांचा वार्षिक उत्सव संत नगरी शेगाव येथे दिनांक 18 व 19 डिसेंबर 2021 ला श्री कृपा लॉन आनंद विहार जवळ शेगाव येथे दोन दिवशीय वार्षिकोत्सव आयोजित करण्यात आला आहे.
या वर्षीक उत्सवाचे उद्घाटन महाराष्ट्र राज्याचे माजी मंत्री रमेशचंद्र बंग यांच्या हस्ते होणार असून कार्यक्रमाचे अध्यक्ष स्थान श्री खांlडल माताजी अखिल भारतीय माहेश्वरी बंग परमार्थ ट्रस्ट मुंडवा राजस्थान चे माजी उपाध्यक्ष गोपीकिशन बंग भूषवतील तर कार्यक्रमाला प्रमुख अतिथी म्हणून श्री खांडल माताजी अखिल भारतीय माहेश्वरी बंग परमार्थ ट्रस्ट मुंडवा राजस्थान चे माजी कोषाध्यक्ष महेश बंग,रामानुज बंग कोलकाता,मुंडवा मारवाड़ चे मनोज बंग, रामनिवास बंग, डॉ. सत्यनारायण बंग नांदेड़,भवरलाल बंग लातूर,मुकुंददास बंग सिकंदराबाद,गुलाबचंद बंग पुणे,प्रामुख्याने उपस्थित राहणार आहेत.
या दोन दिवसीय वार्षिकोत्सव कार्यक्रमात मुंडवा राजस्थान येथील खांडलमाता मंदिराला सहयोग करणाऱ्या सहयोग दातांच व महाराष्ट्र बंग परिवारातील विविध क्षेत्रात नावलौकिक करणाऱ्या मान्यवरांचं सत्कार करण्यात येणार आहे. सदर कार्यक्रमाला महाराष्ट्र बंग परिवारातील सदस्यांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहण्याचे आवाहन आयोजक जुगलकिशोर बंग, महेश बंग, नवलकुमार बंग, संपत बंग यांनी केले आहे.






