माहेरी आलेल्या महिलेची बलात्कार करुन हत्या

0
13

अमरावती दिनांक 6 डिसेंबर (प्रतिनिधि)

जिल्ह्यातील लोणी टाकळी येथील एका विवाहित महिलेवर बलात्कार करून गळा आवळून तिचा खून केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. सदर महिला भाऊबीजनिमित्त माहेरी आली होती. जिल्ह्यात महिलेचा खून होण्याची महिनाभरातील ही दुसरी घटना असून या घटनेने जिल्ह्यात एकच खळबळ उडाली आहे.

पोलिसांच्या सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, महिलेच्या वडिलांनी पोलिसात तक्रार दिली असून पोलिसांनी त्याआधारे अज्ञात आरोपीचा तपास सुरू केला आहे. सदर महिला शनिवारी दुपारी तीन वाजताच्या सुमारास शौचास जाते असे सांगून घराबाहेर पडली होती. त्यानंतर बराच वेळा झाला तरी घरी परतली नाही म्हणून घरातील सदस्याने तिचा शोध घेण्यास सुरुवात गेली.

नातेवाईकांनी तिचा आजूबाजूच्या परिसरात शोध घेतल्यानंतरही ती सापडली नाही. त्यानंतर रविवारी तिचा मृतदेह सापडला. महिलेचा मृतदहे सापडल्याने लोणी टाकळी परिसरात एकच खळबळ उडाली आहे. साडीच्या पदराने गळा आवळून खून केल्याचा प्राथमिक अंदाज आहे. तसंच, हत्येपूर्वी तिच्यावर बलात्कार केल्याचाही अंदाज पोलिसांनी व्यक्त केला आहे

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here