आज नाना पटोलेंच्या मुलीचा विवाह,सर्वपक्षीय नेत्यांना निमंत्रण

0
17

महाराष्ट्र दिनांक 1 डिसेंबर ( विशेष प्रतिनिधी)

महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस अध्यक्ष नाना पटोले यांची कन्या निता पटोले आणि व्यावसायीक रोहन काळभोर यांचा विवाह आज पुणे येथे होणार आहे. नानांचे निकटवर्तीय पुण्यात पोहोचले आहेत. राजकीय नेते पाहुणे  वेळेवर पोहोचून या सोहळ्याला उपस्थिती दर्शवणार असल्याची माहिती आहे.

नाना पटोले यांनी या लग्नाचे निमंत्रण सर्वपक्षीय नेत्यांना दिले आहे. आज पुणे येथे जवळपास सर्वच राजकीय पक्षांतील नेते, सामाजिक कार्यकर्ते उपस्थित राहणार असल्याचे सांगण्यात येत आहे.

प्राप्त माहितीनुसार, हा विवाह सोहळा नाना पटोलेंचा गृहजिल्हा असलेल्या भंडारा किंवा नागपूर येथे होणार होता. पण आत्ता कोरोनाच्या तिसऱ्या व्हेरीअंटचा प्रकोप वाढणार असल्याची शक्यता लक्षात घेता नाना पटोलेंनी कमित कमी पाहुण्यांमध्ये हा लग्न सोहळा पुणे येथे आयोजित केला असल्याची माहिती मायभूमि न्यूज ला मिळाली आहे

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here