नगरविकास राज्यमंत्री प्राजक्त तनपुरे 12 ला वर्धा जिल्हयाच्या दौ-यावर

0
16

वर्धा दिनांक 11 नोव्हेंबर (प्रतिनिधी)  :-राज्याचे नगरविकास, उर्जा, आदिवासी विकास, उच्च व तंत्रशिक्षण राज्यमंत्री प्राजक्त तनपुरे  दि.12 नोव्हेंबर रोजी जिल्हयाच्या दौ-यावर येत आहे. त्यांचा दौरा कार्यक्रम असा आहे.

शुक्रवार दि.12 नोव्हेंबर रोजी सकाळी 10.40 वाजता नागपूर येथून वर्धाकडे प्रयाण करतील. दुपारी 12 वाजता शासकिय विश्रामगृह येथे राष्ट्रवादी कॉग्रेस पक्षाच्या पदाधिका-यांसोबत चर्चा करतील. दुपारी 2 वाजता जिल्हाधिकारी कार्यालय येथे जिल्हयातील नगर परिषद व नगर पंचायती मधील विविध विषयाच्या आढावा बैठकीस उपस्थिती.

दुपारी 3 वाजता जिल्हाधिकारी कार्यालय येथे पत्रकार परिषदेस उपस्थिती. दुपारी 3.30 वाजता वर्धा येथून वागदरा कडे प्रयाण करतील. दुपारी 4 वाजता वागदरा येथे आगमन व आदिवासी पाडास भेट देतील. सायंकाळी 5 वाजता वागदरा येथून चंद्रपूर कडे प्रयाण करतील.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here