वाशिम दि.06 नवंबर(प्रतिनिधि) -जिल्ह्यातील ४० गावात रिक्त असलेल्या रास्तभाव दुकानासाठी संबंधित गावात जाहीरनामे प्रसिद्ध करून ८ ते २२ नोव्हेंबर २०२१ या कालावधीत इच्छुकांकडून संबंधित तहसील कार्यालयामार्फत विहित नमुन्यात अर्ज मागविण्यात येत आहे.
राष्ट्रीय अन्न सुरक्षा अधिनियम २०१३ च्या तरतुदीनुसार नवीन रास्तभाव धान्य दुकाने पंचायत ( ग्रामपंचायत व तत्सम स्थानिक स्वराज्य संस्था), नोंदणीकृत स्वयंसहाय्यता बचत गट, नोंदणीकृत सहकारी संस्था, महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियम किंवा संस्था नोंदणी अधिनियम या कायद्याचे अंतर्गत नोंदणी झालेल्या संस्था, महिला स्वयंसहाय्यता बचत गट व महिलांच्या सहकारी संस्था यांना प्राधान्याने मंजूर करण्यात येतील.अर्ज दाखल करण्याची शेवटची तारीख २२ नोव्हेंबर २०२१ आहे.
तालुकानिहाय रिक्त असलेली रास्त भाव दुकाने गाव व वार्ड पुढीलप्रमाणे.
*वाशिम तालुका -* वाशिम शहर वार्ड क्रमांक १, खंडाळा/ खुर्द, कुंभारखेडा, केकतउमरा,वांगी,काटा भाग-२, दुधखेडा, धारकाटा, कानडी, कामठवाडा व घोटा.
*मालेगाव तालुका -* कुरळा, जामखेड, वरदरी/खुर्द, पांगरखेडा, मुसळवाडी व वाकापूर.
*रिसोड तालुका -* तपोवन,जायखेडा, पाचांबा व कोयाळी/खुर्द.
*मंगरूळपीर -* एकांबा, मोतसावंगा, शेलगाव, स्वाशीन, वाढा व रामगाव.
*कारंजा तालुका -* धोत्रा/जहांगिर, वडगाव/ रंगे, वढवी,पिंपळगाव/खुर्द, जामदरा/ घोटी,
*मानोरा तालुका -* जवळा/ खुर्द,पाळोदी भाग -१, पाळोदी भाग -२, शेंदोणा, शिंगडोह, गोंडेगाव, बोरव्हा व देऊळवाडी या ठिकाणी रिक्त असलेल्या रास्तभाव दुकानासाठी अर्ज मागविण्यात येत आहे.






