सरकारी ई-मार्केटप्लेसमध्ये नोंदणी केल्यापासून व्यवसायाचे प्रमाण वाढले आहे: ‘जेम’ विक्रेते

0
17

नागपूर दिनांक 18 सप्टेंबर ( महनगर प्रतिनिधी)

सरकारी ई-मार्केटप्लेस जेम वरील अनेक विक्रेत्यांनी आज नागपूर येथे आयोजित जेम ‘सेलर संवाद’ (विक्रेत्यांशी संवाद)मध्ये त्यांचे अनुभव सांगितले. यात विक्रेत्यांना जेमची नवीन वैशिष्ट्ये आणि कार्यक्षमतेबद्दल जाणून घेण्याची संधी मिळाली. यामुळे त्यांना पोर्टलचा उपयोग अधिक सुलभतेने करता येतो.

जेमचे महाराष्ट्र व दमण आणि दीवसाठीचे बिझनेस फॅसिलिटेटर( व्यवसाय सुलभकर्ते) निखिल पाटील यांनी माहिती दिली की जेम पोर्टल फक्त केंद्र सरकारच्या कार्यालयांपुरते मर्यादित नाही. हे केंद्र/राज्य सरकारी मंत्रालये, विभाग, संस्था आणि सार्वजनिक उपक्रमांसह सर्व सरकारी खरेदीदारांसाठी वन-स्टॉप ऑनलाइन खरेदी पोर्टल प्रदान करते.

आपल्या सादरीकरणात पाटील यांनी लघु आणि मध्यम उद्योगांना जेम पोर्टलच्या माध्यमातून व्यवसाय करण्याचे लाभ सांगितले. सूक्ष्म आणि लघुउद्योगांना विशेषत: एकच मालक असलेल्या उद्योगांना आता जेम मंचावर ऑर्डर स्वीकारण्याच्या वेळेस कर्ज मिळू शकते. व्यवसाय करणे सुलभ करण्यासाठी गेल्या 24 महिन्यांत जेमवर अंदाजे 2,000 किरकोळ आणि 460 हून अधिक कार्यावली सादर करण्यात आल्या आहेत.

 

गव्हर्नमेंट ई मार्केटप्लेस (जेम) :

राष्ट्रीय सार्वजनिक खरेदी पोर्टल -गव्हर्नमेंट ई मार्केटप्लेस (जेम ), ही वस्तू आणि सेवांच्या खरेदीसाठी अथपासून इतिपर्यंत सेवा पुरवणारी ऑनलाइन बाजारपेठ आहे.

सार्वजनिक खरेदीची पुनर्व्याख्या प्रस्थापित करण्याच्या पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या संकल्पनेचा एक भाग म्हणून 9 ऑगस्ट 2016 रोजी या पोर्टलचा प्रारंभ करण्यात आला. जेम संपर्कविरहित, कागदविरहित आणि कॅशलेस असून कार्यक्षमता, पारदर्शकता आणि सर्वसमावेशकता या तीन स्तंभांवर उभारलेले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here