स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवानिमित्त वाशिम येथे शनिवारी ‘फ्रीडम रन’चे आयोजन

0
9

वाशिम, दि. १७ (प्रतिनिधि) : भारतीय स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवानिमित्त नेहरू युवा केंद्रामार्फत शनिवार, १८ सप्टेंबर रोजी सकाळी ७ वाजता वाशिम येथे जिल्हास्तरीय ‘फ्रीडम रन’चे आयोजन करण्यात आले आहे. जास्तीत जास्त युवकांनी फ्रीडम रनमध्ये सहभागी होण्याचे आवाहन नेहरू युवा केंद्राचे जिल्हा युवा अधिकारी आशिष पंत, अनिल ढेंगे यांनी केले आहे.

१८ सप्टेंबर रोजी सकाळी ७ वाजता आमदार अॅड. किरणराव सरनाईक यांच्या हस्ते हिरवी झेंडी दाखवून वाशिम जिल्हा क्रीडा संकुल येथून जिल्हास्तरीय फ्रीडम रनला सुरुवात होणार आहे. यावेळी जिल्हाधिकारी षण्मुगराजन एस., जिल्हा पोलीस अधीक्षक वसंत परदेशी यांची प्रमुख उपस्थिती राहील.

भारतीय स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवानिमित्त नेहरू युवा केंद्रामार्फत वाशिम जिल्ह्यात १३ ऑगस्ट ते २ ऑक्टोबर २०२१ दरम्यान ७५ गावांमध्ये फ्रीडम रनचे आयोजन करण्यात आले आहे. फ्रीडम रनच्या माध्यमातून आरोग्य सदृढ ठेवण्यासाठी व गाव स्वच्छ ठेवण्यासाठी संदेश देण्यात येत आहे. ‘जन भागीदारी ते जन आंदोलन’ या संकल्पनेतून युवकांचे आरोग्य सदृढ राहावे, त्यांनी दररोज विविध खेळांमध्ये सहभाग घ्यावा, इतरांनाही आरोग्य सदृढ ठेवण्यासाठी जागृत करावे, याविषयी फ्रीडम रनच्या माध्यमातून संदेश दिला जाणार आहे. तरी या फ्रीडम रनमध्ये वाशिम जिल्ह्यातील युवकांनी सहभागी होण्याचे आवाहन केले जात आहे

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here