डॉ दिलीप मालखेडे यांची संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठाच्या कुलगुरू पदी नियुक्ती

0
10

पुणे येथील कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग येथे यांत्रिकी अभियांत्रिकी विषयाचे प्राध्यापक असलेल्या डॉ दिलीप नामदेवराव मालखेडे यांची संत गाडगे बाबा अमरावती विद्यापीठाच्या कुलगुरूपदी नियुक्ती करण्यात आली आहे.

राज्यपाल तथा कुलपती भगतसिंह कोश्यारी यांनी डॉ मालखेडे यांची पाच वर्षांच्या कार्यकाळासाठी ही नियुक्ती केली आहे.

डॉ मालखेडे सध्या अखिल भारतीय तंत्र शिक्षण परिषद येथे सल्लागार  -१ या पदावर प्रतिनियुक्तीवर काम करीत आहेत.

माजी कुलगुरू डॉ मुरलीधर चांदेकर यांचा कार्यकाळ  दिनांक १ जून २०२१ रोजी संपल्यामुळे हे कुलगुरूपद रिक्त होते.

डॉ पंजाबराव देशमुख कृषि विद्यापीठाचे कुलगुरू डॉ विलास भाले यांचेकडे पदाचा अतिरिक्त कार्यभार देण्यात आला होता.

 

 

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here