स्व.देवकीबाई बंग कनिष्ठ महाविद्यालयाची रेट्रो इन मेट्रो

0
15

हिंगणा दिनांक 22 ऑगस्ट ( प्रतिनिधी)

स्व. देवकीबाई बंग कनिष्ठ महाविद्यालय हिंगणा येथील अकराव्या वर्गात प्रवेशित विद्यार्थ्यांची फ्रेशर्स पार्टी रेट्रो इन मेट्रो म्हणून धावत्या मेट्रोत साजरी करण्यात आली. याकरिता विद्यालयाच्या वतीने लोकमान्य नगर ते बर्डी – बर्डी ते लोकमान्य नगर या मार्गावर मेट्रो दोन तासाकरिता आरक्षित करण्यात आली होती.

यावेळी विद्यार्थी व शिक्षकांनी गीत गायन, नृत्य, अभिनय आदींचे सादरीकरण धावत्या मेट्रोत करून एक विलक्षण अनुभव घेतला. कनिष्ठ महाविद्यालयातील नवप्रवेशित विद्यार्थ्यांनी तर या कार्यक्रमात धम्माल केली.

यावेळी संस्थेचे संचालक महेश बंग, संचालिका अरुणा बंग, स्व. देवकीबाई बंग विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालयाचे प्राचार्य नितीन तुपेकर, नेहरू विद्यालयाचे मुख्याध्यापक शशिकांत मोहिते, स्व. देवकी बाई बंग प्राथमिक शाळेच्या मुख्याध्यापिका मंगला लाकडे,स्व. देवकीबाई बंग इंग्लिश मीडियम स्कूल कन्होलीबाराचे मुख्याध्यापक संदीप कैलुके, विनोद वानखेडे, श्वेता तुपेकर आदींसह संत गमाजी महाराज शिक्षण संस्थेतील सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here