नागपूर दिनांक 22 ऑगस्ट ( महानगर प्रतिनिधी)
• विदर्भ डिफेन्स इंडस्ट्रीज असोसिएशन आणि यंत्र इंडिया लिमिटेड यांच्यात सामंजस्य करार
• ऑर्डनन्स फॅक्टरी अंबाझरी, नागपूर येथे असलेल्या यंत्र इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी अँड मॅनेजमेंटमध्ये सुविधा उपलब्ध
विदर्भातील तरुणांना आता संरक्षण आणि एरोस्पेसमधील कौशल्य विकास आणि नोकरी प्रशिक्षण सुविधांसाठी शोधाशोध करण्याची आवश्यकता नाही कारण विदर्भ डिफेन्स इंडस्ट्रीज असोसिएशन आणि यंत्रा इंडिया लिमिटेडच्या (DPSU) यांच्या दरम्यान फॅक्टरी लर्निंग इन्स्टिट्यूट, ऑर्डिनन्स फॅक्टरी अंबाझरी, नागपूर येथील यंत्र इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी अँड मॅनेजमेंट आणि कॉमन फॅसिलिटी सेंटर येथे ‘ सेंटर ऑफ एक्सलन्स’ आणि ‘केंद्रीकृत सुविधा केंद्र’ स्थापन करण्यासाठी सामंजस्य करार झाला आहे. यामुळे आता तरुणांना नागपुरातच संरक्षण आणि एरोस्पेसमधील कौशल्य विकास आणि नोकरी प्रशिक्षण सुविधा उपलब्ध होणार आहे.
यंत्रा इंडिया लिमिटेड ने विदर्भ आणि मध्य भारतातील तरुणांना या क्षेत्रात करिअर करण्याला प्रोत्साहन देण्यासाठी नागपूर येथे ग्लोबल सेंटर ऑफ एक्सलन्स इन डिफेन्स, एरोस्पेस स्थापन करण्यासाठी विदर्भ डिफेन्स इंडस्ट्रियल हब च्या उपक्रमाला पाठिंबा देण्यासाठी पुढाकार घेतला आहे.
व्हीडीआयएच चे दुष्यंत एन देशपांडे यांनी सांगितले की, ‘संपूर्ण इकोसिस्टम एरोस्पेस, एव्हिएशन आणि संरक्षण क्षेत्रातील विकासाचे केंद्र बनेल. सुरुवातीला आम्ही वायआयटीएमच्या पायाभूत सुविधांचा वापर करण्याचा प्रस्ताव ठेवला, ज्याचा उपयोग युडीएएन -कौशल्य विकास केंद्र तयार करण्यासाठी केला जाईल आणि त्यानंतर ‘ऑर्डीनन्स फॅक्टरी अंबाझरी ‘ च्य विद्यमान सेटअपमध्ये NIRMAN (एनआयआरएमएएन)-इंटिग्रेटेड मॅन्युफॅक्चरिंग कम सेंट्रलाइज्ड फॅसिलिटी सेंटरची स्थापना केली जाईल.
यंत्र इंडिया लिमिटेड चे चेयरमन आणि मॅनेजिंग डायरेक्टर, आयओएफएस राजीव पुरी यांनी सांगितले की ‘या प्रकल्पाचा मुख्य उद्देश कौशल्य विकास आणि रोजगार प्रशिक्षण सुविधा प्रदान करणे हा आहे जेणेकरून संरक्षण आणि एरोस्पेस क्षेत्रात स्थानिक लोक रोजगारक्षम होऊ शकतील व्हीडीआयएच केंद्रीकृत सुविधा देखील प्रदान करेल ज्यामुळे स्वतःचा उत्पादन उद्योग सुरू इच्छुकांना ते उपयुक्त ठरतील. व्हीडीआयएच द्वारे संभाव्य उद्योजकांसाठी आवश्यक कायदेशीर आणि तांत्रिक-व्यावसायिक मार्गदर्शन देखील प्रदान केले जाईल.
व्हिडीआयएच चे संयोजक दुष्यंत देशपांडे यांनी याविषयी अधिक प्रकाश टाकताना सांगितले की व्हिडीआयएच किमान 40,000 व्यक्तींना पाच वर्षांत UDAN (युडीएएन) एरो डिफेन्स सेंटर ऑफ एक्सलन्स येथे प्रशिक्षण देईल. यात एकात्मिक उत्पादनाद्वारे रिव्हर्स इंजिनीअरिंग, प्रोटोटाइपिंग, उत्पादन विकास या क्षेत्रात नागपूरच्या आसपासच्या लघु आणि मध्यम उद्योगांना निर्माण केंद्रात प्रशिक्षणाद्वारे कौशल्य प्राप्त करण्यास सक्षम करण्यात येईल.
यामुळे एरोस्पेस आणि डिफेन्स मॅन्युफॅक्चरिंगमधील उदयोन्मुख संधी आत्मसात करण्यासाठी अनुकूल आणि भविष्यातील उद्योगासाठी तयार वर्कफोर्स तयार होईल. अशा प्रकारे व्हीडीआयएच रोजगार निर्माण करेल, कुशल मनुष्यबळ निर्माण करेल आणि विदर्भात उद्योगधंदे वाढविण्यास योगदान देईल.
आर्थिक तरतूद: नागपुर येथे सामायिक सुविधा केंद्र उभारण्याच्या प्रस्तावाच्या संदर्भात उद्योग, ऊर्जा, कामगार विभागाने व्हीडीएचए निर्माण क्लस्टरला रु 30 कोटी आर्थिक तरतूद करून दिली आहे. एरोस्पेस आणि संरक्षण धोरणांतर्गत झालेल्या बैठकीत उद्योग सचिवांनी एमआयडीसीला नागपूर येथील सीएफसीच्या विकासासाठी 30 कोटी इक्विटी जारी करण्यासाठी योग्य उपाययोजना करण्याचे निर्देश दिले होते.
उडान- एरोस्पेस आणि डिफेन्समध्ये कौशल्य विकासासाठी सेंटर ऑफ एक्सलन्स स्थापन करण्याच्या प्रस्तावाच्या संदर्भात, हे लक्षात घेण्यासारखे आहे की SDED आणि MSSDS ने रु. PMKVY G.R SDED 2018/P.No1/मिशन-1 Dt 30 मे 2019 अंतर्गत विशेष प्रकल्पासाठी अनुदान म्हणून 63 कोटी हे अनुदान ५ वर्षात वापरण्यासाठी मंजूर केले आहे जेणेकरून या कालावधीत 40000 तरुणांना प्रशिक्षित केले जाऊ शकेल.
कोविड परिस्थितीमुळे प्रकल्प तात्पुरता होल्डवर ठेवण्यात आला ज्यामुळे अनुदान आणि आर्थिक मदतीचे वितरण झाले नाही. त्यानंतर कोविड परिस्थिती निवळल्यामुळे सर्व निर्बंध काढून टाकण्यात आले असल्याने, 26 जुलै रोजी आम्ही आयुक्त एसडीईडी यांना विनंती केली आणि 23 जुलै 2022 रोजी सीईओ एमआयडीसी यांना व्हीडीआयए -वायआयएल यांनी एकत्रित येऊन OFIL अंबाझरी नागपूर येथे COE सुरू करण्यासाठी योग्य यंत्रणा उभारून कारवाई करण्यासाठी पत्र लिहिले. .
विदर्भ डिफेन्स इंडस्ट्रीज असोसिएशन आणि यंत्र इंडिया लिमिटेड यांच्यातील सहकार्याबद्दल : विदर्भ डिफेन्स इंडस्ट्रियल हब हा यंत्रा इंडिया लिमिटेड आणि विदर्भ डिफेन्स इंडस्ट्रीज असोसिएशन यांच्या संयुक्त विद्यमाने सार्वजनिक खाजगी भागीदारी उपक्रम आहे आणि नागपूर आणि आसपासच्या स्थानिक उद्योगांकडून याला प्रोत्साहन आणि सहकार्य लाभत आहे.
महाराष्ट्र सरकार या प्रयत्नात सहभागी होण्यासाठी पुढे आले होते. आम्ही मॅग्नेटिक महाराष्ट्र दरम्यान नागपुरात उडान-एरो डिफेन्स स्किल कॉम्पिटन्स सेंटर आणि निर्माण-सीएफसी कम इंटिग्रेटेड मॅन्युफॅक्चरिंग सेंटर स्थापन करण्यासाठी सामंजस्य करार केला होता. विदर्भ डिफेन्स इंडस्ट्रीज असोसिएशन ने महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळ सोबत महाराष्ट्राला एरोस्पेस आणि संरक्षण उद्योगांसाठी पसंतीचे ठिकाण म्हणून प्रोत्साहन देण्यासाठी MOU देखील केला आहे.
विशेषत: नागपूरच्या विकासासाठी एक प्रमुख प्रोत्साहन गुणक सप्टेंबर 2021 मध्ये घडले, जेव्हा भारत सरकारने पूर्वीच्या आयुध निर्माणी मंडळाचे कॉर्पोरेटीकरण केले. यंत्रा इंडिया लिमिटेड ची स्थापना करण्यात आली आणि त्याचे मुख्यालय ऑर्डनन्स फॅक्टरी अंबाझरी इथं स्थपण्यात आले. YIL आणि VDIA मधील सामंजस्य कराराची देवाणघेवाण DEFEXPO202 गांधीनगर येथे 18 ऑक्टोबर ते 22 ऑक्टोबर दरम्यान होणाऱ्या बंधन कार्यक्रमात होईल.
ही माहिती देताना डॉ. बी हंटल, ओआईसी/वाईआईटीएम; डी वी गोंडानाले, सीनियर सलाहकार/वीआईडीए; राजीव गुप्ता, जीएम ओएफएजे; एसके यादव, निदेशक संचालन/वाईआईएल, राजीव पुरी, सीएमडी/वाईआईएल; गुरुदत्त रे, निदेशक एचआर/वाईआईएल; राकेश सिंह लाल, निदेशक वित्त/वाईएएल, और दुष्यंत देशपांडे, निदेशक वीडीआईएच उपस्थित होते







