तर बावनकुळे महाराष्ट्राचे मुख्यमंत्री होतील, फडणवीसांनसमोरच गडकरींचे मोठे विधान

0
17

नागपूर दिनांक 13 ऑगस्ट ( शहर प्रतिनिधी)

राज्याचे मुख्यमंत्री तर देवेंद्र फडणवीसच व्हावे, पण जर ते केंद्रात गेले तर राज्यात बावनकुळे हे मुख्यमंत्रीही होऊ शकतात. तसं मी म्हणत नाही. पण भारतीय जनता पक्षाचे प्रदेशाध्यक्ष झालेले नेते पुढे काय होतात, हे राज्यातील जनतेला माहिती आहे.

असे सूचक विधान केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी केले. भाजपचे नवनियुक्त प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांच्या सत्कार सोहळ्यात ते बोलत होते. व्यासपीठावर राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासह मान्यवरांची उपस्थिती होती.

पुढे गडकरी म्हणाले, मी असं म्हणत नाही की बावनकुळे हे राज्याचे मुख्यमंत्री होतील. मात्र भाजपच्या प्रदेशाध्यक्ष पुढे काय होतात. हे उभ्या महाराष्ट्राने बघितले आहे. त्यामुळे माध्यमांनी ‘फडणवीसांना गडकरींचे संकेत’ केंद्रात जाणार अशा बातम्या माझ्या नावाने खपवू नका, हिम्मत असेल तर तुमच्या नावाने चालवा, असा चिमटाही माध्यमांना त्यांनी काढला.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here