नागपूर दिनांक 13 ऑगस्ट ( महानगर प्रतिनिधी)
नागपूर महानगर पालिका आणि OCW नेहरू नगर झोन ह्यांनी नवीन टाकलेले जलवाहिनी चार्ज करण्यासाठी तसेच नंदनवन स्थित नंदनवन १, २ आणि ३ हे जलकुंभ चे नेटवर्क विभक्त करण्यासाठी १८ तास तसेच सतरंजीपुरा झोन अंतर्गत बस्तरवाडी जलकुंभ येथे आंतरजोडणी आणि नवीन नेटवर्क चार्ज करण्यासाठी ३० तास अवधी चा शटडाऊन येत्या दि १६ ऑगस्ट,(मंगळवार)) ते १७ ऑगस्ट २०२२ (बुधवार) दरम्यान घेण्याचे ठरविले आहे.
ह्या शटडाऊन दरम्यान नेहरू नगर झोन ३ जलकुंभ ( नंदनवन १, नंदनवन २ आणि नंदनवन ३) मधील आणि सतरंजीपुरा झोन मधील ३ जलकुंभ (बस्तरवारी १, बस्तरवारी २, बस्तरवारी ३) चा पाणीपुरवठा बाधित राहणार आहे .
या शटडाऊनमुळे पाणी पुरवठा बाधित राहणारे भाग पुढीलप्रमाणे:
*सतरंजीपुरा झोन : ३० तासाचे शटडाऊन दिनांक १६ सकाळी १० ते दिनांक १७ ऑगस्ट दुपारी ४ पर्यंत* :
बस्तरवारी १ जलकुंभ:- लालगंज, तेलीपुरा पेवठा,कौमी बाग, प्रेम नगर, नारायणपेठ, श्रीरामवाडी, धी बाजार, दलाल पुरा चौक, खैरीपुरा, झाडे चौक,
बस्तरवारी २ जलकुंभ:– मेहेंदी बाग, किनखेडे लेआऊट, जामादारवाडी, वृंदावन नगर, शाहू मोहल्ला, कुंदनलाल गुप्ता नगर, पोळा मैदान, नामदेव नगर, इंदिरा नगर, कोलबास्वामी नगर, पाठराबे वाडी, जोशीपुरा, सोनार टोली, आनंद नगर, हुडो कॉलोनी, कांजी हाऊस चौक.
बस्तरवारी ३ जलकुंभ:- बांगलादेश, तांडापेठ, नाईकतलाव, संभाजी कासार, मुसलमानपुरा, लेंडी तलाव, लाडपुरा, नंदगिरी रोड, स्वीपर कॉलनी, ठक्कर ग्राम, पाचपावली, विणकर कॉलोनी, मराठा चौक, चकना चौक.
*नेहरू झोन : १८ तासांचे शटडाऊन दिनांक १६ सकाळी १० ते ऑगस्ट १७ सकाळी ६ पर्यंत* :
नंदनवन १: नंदनवन ले आउट , नंदनवन कॉलोनी, NIT, LIG, MIG कवेलू व्यंकटेश नगर, कीर्ती नगर , प्रशांत नगर, हसनबाग, नंदनवन स्लम , के डी के कॉलेज जगनाडे चौक राजेंद्र नगर आणि इतर भाग
नंदनवन २: न्यू डायमंड नगर , शेष नगर, विद्या नगर, गोपालकृष्ण नगर , श्रीकृष्ण नगर , शक्तिमाता नगर शिवशंकर नगर, सरस्वती नगर, वृंदावन नगर , गंगा विहार कॉलोनी, इंदिरा देवी टाऊन , संकल्प नगर , नाहुबली नगर, सहकार नगर, विजय पंडित नगर, सद्भावना नगर, दर्शन कॉलोनी आणि इतर परिसर
नंदनवन ३: गुरुदेव नगर, बाप्पू नगर, कबीर नगर, मिरे ले आउट, भांडे प्लॉट, प्रेम नगर, श्याम बाग , संतोषी माता नगर , सिंधी बन , औलिया नगर , हरिपूर नगर, ताजबाग स्लम , ताजबाग ट्रस्ट , कामगार नगर, रमना मारुती नगर, पवनसुत नगर, चिटणीस नगर , आदर्श नगर , धन्वन्तरी नगर , रतन नगर, गाडगे बाबा नगर मित्र विहार नगर आणि इतर भाग
ह्या नेहरू नगर आणि सतरंजीपुरा झोन शटडाऊन कालावधी दरम्यान आणि नंतर देखील बाधित भागांना टँकरद्वारेही पाणीपुरवठा होऊ शकणार नाही. नागपूर महानगरपालिका व ऑरेंज सिटी वॉटर यांनी ह्या भागातील सर्व नागरिकांना विनंती केली आहे कि त्यांनी परिवाराच्या वापराकरिता पुरेसा पाणीसाठा करून सहकार्य करावे…






