बँकांनी पीक कर्ज वाटपाचे प्रलंबित प्रकरणे तातडीने निकाली काढावे – जिल्हाधिकारी अमोल येडगे

0
11

यवतमाळ दि. 25 ऑगस्ट : शेतकऱ्यांनी पीक कर्जासाठी अर्ज दिल्यावर कोणत्याही परिस्थितीत जास्तीत जास्त चार ते पाच दिवसात प्रकरण निकाली काढण्यात यावे, शेतकऱ्यांना वारंवार बँकेत बोलावू नये, तसेच सध्या प्रलंबित असलेली पीक कर्ज वाटपाची प्रकरणे गरजेनुसार शनिवार व रविवारी जादा वेळ कामे करून तातडीने निकाली काढावी व पीक कर्ज वाटपाची गती वाढवावी अशा सूचना जिल्हाधिकारी अमोल येडगे यांनी आज बँकर्सना दिल्या.

खरीप पीक कर्ज वाटपातील प्रलंबित प्रकरणांचा आढावा व महसूल अधिकाऱ्यांची आढावा बैठक जिल्हाधिकारी यांनी आज नियोजन भवन येथे घेतली. यावेळी मुख्यय कार्यकारी अधिकारी डॉ. श्रीकृष्ण पांचाळ, एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्पाचे प्रकल्प अधिकारी तथा सहाय्यक जिल्हाधिकारी सावन कुमार, अपर जिल्हाधिकारी प्रमोदसिंह दुबे, निवासी उपजिल्हाधिकारी ललितकुमार वऱ्हाडे, जिल्हा अग्रणी बँकेचे व्यवस्थापक अमर गजभिये तसेच विविध बँकांचे प्रतिनिधी उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here