यवतमाळ दिनांक 8 जुलै (प्रतिनिधी )
गेल्या 24 तासात यवतमाळ जिल्ह्यात 7 जण कोरोना पॉझिटिव्ह आढळून आले तर 7 जण कोरोनामुक्त झाले आहेत. यामुळे ॲक्टीव्ह पॉझिटीव्ह रुग्णांची संख्या जिल्ह्यात 58 झाली आहे.
जिल्हा परिषद आरोग्य विभागातर्फे प्राप्त अहवालानुसार आज एकूण 411 जणांचे रिपोर्ट प्राप्त झाले. यापैकी 7 अहवाल पॉझिटिव्ह असल्याने उर्वरित 404 जणांचे रिपोर्ट निगेटिव्ह आले आहेत.
जिल्ह्यात आतापर्यंत एकूण पॉझेटिव्ह रुग्णांची संख्या 79236 आहे. तर आतापर्यंत बरे झालेल्यांची एकूण संख्या 77375 झाली आहे. जिल्ह्यात कोरोनामुळे एकूण 1803 मृत्यूची नोंद आहे.
जिल्ह्यात आतापर्यंत आठ लाख 85 हजार 666 चाचण्या झाल्या असून त्यापैकी आठ लाख सहा हजार 430 निगेटिव्ह आहेत. सद्यस्थितीत जिल्ह्याचा पॉझिटीव्हीटी दर 8.95 असून दैनंदिन पॉझिटीव्हीटी दर 1.70 आहे तर मृत्यूदर 2.28 आहे.
आज पॉझिटीव्ह आलेल्यांमध्ये दारव्हा तालुक्यातील सहा व यवतमाळ येथील एक रूग्ण असून त्यात चार महिला व तीन पुरूषांचा समावेश आहे.
नागरिकांनी कोरोना त्रीसुत्री नियमांचे पालन करावे, तसेच कोरोनाचा पहिला, दुसरा व तीसरा डोज घेवून संपुर्ण लसीकरण करावे व स्वत:ला सुरक्षीत करावे, असे आवाहन जिल्हाधिकारी अमोल येडगे यांनी केले आहे.






