वाशिम कृषी उत्पन्न बाजार समितीत सोयाबीनला आजपर्यंतचा उच्चांकी दर !

0
28

विदर्भातील सोयाबीनची सर्वात मोठी बाजारपेठ म्हणून ओळख असलेल्या वाशिम कृषी उत्पन्न बाजार समितीत आज उच्चांकी दहा हजार शंभर रुपये प्रति क्विंटल इतका दर मिळाला आहे. सोयबीनला प्रति क्विंटल मिळालेला आजपर्यंतचा हा सर्वात जास्त दर आहे.

सोयाबीनला शासकीय आधारभूत किंमत 3880 रुपये असताना हा मिळालेला दर अडीचपटीने जास्त असल्याने सोयाबीन उत्पादक शेतकरयांमध्ये आनंदाचे वातावरण निर्माण झाले आहे. मात्र सोयाबीनच्या हंगामात दर चार हजार रुपये असल्याने बहुतांश शेतकऱ्यांनी सोयाबीनची आधीच विक्री केली आहे. त्यामुळे या वाढीव दराचा फायदा शेतकऱ्यांना कमी आणि व्यापाऱ्यांनाच जास्त होत असल्याचे बोलले जात आहे.

वाशिम जिल्हा हा सोयाबीन उत्पादनात अग्रेसर आहे. जिल्ह्यात एकूण चार लाख हेक्टर क्षेत्रापैकी तीन लाख हेक्टरच्या वर सोयाबीन ची पेरणी झाली आहे. त्यामुळे सोयाबीन ला मिळालेला दर हा आजपर्यंतचा उच्चांकी दर आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here